Saturday, October 4, 2014

स्वप्न ५७

स्वप्न ५७

रोज रात्री स्वप्नात 
समुद्र किनारा दिसायचा..
किनार्यावर 
आपल्या पाऊल खूणा उमटवत
वार्याबरोबर बागडत 
तू शंख शिंपले वेचायचीस..
आणि मी ..........................
मी समुद्राची लाट बनून 
तुझ्या आसपास
रेंगाळायचो..
तुझ्या पायाला गुदगुल्या करायचो...
तेव्हा शहारून जायचीस ....
सूर्य मावळू लागला की
जागीच उभी राहात 
एकटक दूर कुठेतरी पहात
हरवून जायचीस..
मी तुला साठवत 
रहायचो समुद्रभर.....
पुन्हा पुन्हा लाट 
होऊन तुझ्याकडे झेपावायचो...
पायाखालून वाळू सरकवताच 
तुझ्या
रोमारोमात तरारून उठणारा
आनंद त्या
निसटत्या क्षणातही पकडायचो..
..
...
...
आतासुध्दा स्वप्नात समुद्र किनारा येतो... 
पण एकही लाट 
किनार्यापर्यंत पोहचत नाही हल्ली...

-अजय

No comments:

Post a Comment