Saturday, October 4, 2014

स्वप्न ५९

स्वप्न ५९

आज ती स्वप्नात आली
अगदी सहज विचारलं तिने मला,
"प्रेम म्हणजे काय रे?"
मला क्षणभर काय बोलू सुचेना
हॄदयाचे ठोके चुकू लागले.
फ़क्त हसलो... म्हटल,
’म..म.... तूच सांग काय ते?’
तीही हसली .. डोक्यात टपली मारत
म्हणाली,
"मग तुला विचारल असत का?आता सांग लवकर?"
मी भांबावत म्हणालो,
"आता मला कस माहीत असणार. मी कुणावर......."
आणि तिथेच शब्द थांबले... माझ्याही नकळत...
क्षणभर सगळीकडे शांतता 
भरून राहिली..
पुढचा बराच वेळ 
दोघांमध्ये
फ़क्त अबोला 
दरवळत राहीला...
..
...
...

तो दरवळ मनामध्ये 
प्रेमांकुर रुजवून गेला......

-अजय

No comments:

Post a Comment