Saturday, October 4, 2014

स्वप्न ६१

##########
गणपती बाप्पा मोरया !!!
#############

स्वप्न ६१


न विसरता चाफ़्याची फ़ुले घेऊन ये,
म्हणालीस आणि रात्रीचं स्वप्न आठवून हसू आल.....
.......
अशीच फोनवर सांगत होतीस,
’दुर्वा... पुजेच साहित्य.. सगळ घेवून ये..
आणि हो चाफ़्याची फ़ुलं अजिबात विसरू नकोस.
माझे मोदक बनवून तयार झाले आहेत..’
ये त्याला २१ आणि मला २१ पाहीजेत बर का
उगाच आमच्यात भांडणं होतात नाहीतर....
"गप रे.. चेष्टा करू नये.. लवकर ये..."
अग दार उघडलस तर आत येणार ना मी.........
हसत हसत दार उघडलस आणि पुन्हा तोच प्रश्न...
"काही विसरला नाहीस ना? चाफ़्याची फ़ुलं
आणलीस ना? बाप्पाला खूप आवडतात.. आजच्या दिवशी
खूप महत्त्व असत..."
.....
...
ही बघ चाफ़्याची फ़ुलं... ....बाप्पासाठी.....
अग कसा विसरेन मी. माझही 
श्रद्धास्थान आहे तो...
....
.....
...
आणि
...
..
तुही..

हा बघ मोगरा....
..
तुझ्यासाठी..

-अजय

No comments:

Post a Comment