Saturday, October 4, 2014

स्वप्न ७७

स्वप्न ७७ 

उशीखाली मोजा ठेवून झोपलो 

आणि खरच 

सान्ता क्लोस 
आला भेटायला .....

काय देऊ तुला ? 
या प्रश्नावर माझ्याकडे पाहत 
पुन्हा तोच हसला.. 
३ वेळा पिशवीत हात 
घातला . 
विचार करत करत
पुन्हा रिकामाच हात वर आला..
नाही म्हटलं तरी गोंधळलाच..
तरी बर मी मला काय हवय ते
सांगितलच नव्हतं .......

शेवटी मीच त्याच्या जवळ गेलो
त्याला 
जादूची झप्पी देत म्हटलं

"Merry Khristmas" !!!!

अस्वस्थ हसला... 
........
कवितांच्या वहीत ठेवलेली 
फुलं त्याच्या ओंजळीत देत
म्हटलं 
गेलासच 
तिच्याकडे तर दे दिला
ही फुलं !!!!!! 
सुकली तरी गंधाळतायेत .......
अजून.... अतृप्त इच्छे सारखी 
खात्री आहे मला 
कि तिचे डोळे 
नक्की भरून येतील ... 
तिच्या डोळ्यातले २ थेंब टिपून घे

आणि घेऊन ये माझ्यासाठी......
..
..
..
.
या कवितेच्या वहीसाठी !!!!!

- अजय

No comments:

Post a Comment