Saturday, October 4, 2014

स्वप्न ७१

स्वप्न ७१

आज पुन्हा ती
खूप खूप चिडली असणार..
छे.... 
ठरवून वा न ठरवूनही
माझ्याच मागे लागलेला
हा उशीर आजही 
झालाच..
च्यायला!!! स्वप्नातसुध्दा
हे असच का व्हाव...
गणित काही कळत नाही...
.......
धावत पळत घरी पोहचलो
दारावरची बेल वाजवली
....
....
आधी खिडकीतून हळूच
डोकावत... 
मग आतून भरल्या आवाजात
तिने
’कोण आहे?’ विचारल
हसत हसत म्हटलो मीही
’फ़ुलवाला आहे बाईसाहेब!!
मोगरा..जाई..जुई.. गुलाब......
.....
...’
आम्हाला फ़ुलं नकोत.."
पलिकडून स्पष्ट उत्तर आलं...
काही फ़ुलं कमी आहेत परडीत
तेवढी फ़क्त मग परत द्या....
’कुठली?’ लाडीक लाडीक
आतून पुन्हा विचारणं झालं
.......
गालांवरची अबोली तेवढी परत
घ्यायला आलोय....
डोळ्यांवरचा प्राजक्त
अलगद टिपून 
घ्यायला आलोय..
मनावरचा दरवळ थोडा 
परडीत साठवून घ्यायचाय..
ओठांवरची रातराणी अलवार..
वेचून घ्यायला आलोय..
......
..
अलगद दार उघडत
हळूच खुदकन गालांत हसली
पुन्हा उशीर केलास तर बघ?
म्हणत हळूच मिठीत शिरली..

-अजय

No comments:

Post a Comment