Saturday, October 4, 2014

स्वप्न ३९

स्वप्न ३९

संध्याकाळ सरत चालली की
मग ...मन भरून येत..
.......
मग तुझ्या आठवणींचा वारा
शरीरभर फ़िरू लागतो..
थैमान घालतो.....
.....
एकेक सरल्या क्षणांचा
पाचोळा पुन्हा 
एकदा वर येतो..
.....
लुप्त झालेल्या इच्छा 
पुन्हा एकदा
चमकून जातात.. 

आणि मग 
तुझ्या स्वप्नांचा

पाऊस 
सुरू होतो..
....
...
.......
.........

नेहमीचच झालय 
आता हे...

-अजय

No comments:

Post a Comment