Saturday, October 4, 2014

स्वप्न ८६

स्वप्न ८६ 

निरंतर पसरलेलं आभाळ...

.................................

आभाळभर 

लगड़लेली स्वप्ने .....

माझ्या हाती रात्र !!!!!!....

..

..डोळे मिटून..

भिरकवयाचो तिला... आभाळाकड़े

आणि आभाळाची फांदी सोडत 

खाली पडत रहायची स्वप्नं .....

कुठेही भिरकावली .. 

आणि कशीही भिरकावली .. 

तरी ...

कोण जाणे कशी पण .. 

हवी हवीशी वाटणारी 

स्वप्नेच पडायची नेहमी ....

..................

...................

.........

पण हल्ली ... 

शांत निपचित 

पडून राहिलो तरी...

माझ्या रात्रीवर 

पडतच रहातात ...

एकेक पिकली 

स्वप्नं !!!!!!!!!!!!!!!!!

..............
.........
त्यांच्या 

चेहर्यावरही तेच भाव...

निर्विकार .. निश्चल... शांत !!!

............

...

हवी असोत व नसोत ... पण आजही 

स्वप्नं पड़तातच...



फरक एवढाच आहे ..


आधी मला ती हवी 

असायची ...

...

....

आता त्यांना मी !!!!!!!!!!!!!



-अजय

No comments:

Post a Comment