Saturday, October 4, 2014

स्वप्न ८०

स्वप्न ८० 

समुद्र......
उधाणलेला... 
कधी शहारलेला...
कधी तृप्त .....
कधी तहानलेला 
सगळं काही स्वतामध्ये सामावून 
घेऊन 
शेवटी अलिप्त उरलेला....
रोज रात्री जेव्हा समुद्र किनार्यावर जातो
तेव्हा 
दूरवर भरून घेतलेला असतो त्याने 
स्वतामध्ये अंधार ..... 
....
...
तो साठवून ठेऊ शकतो 
त्याला हव ते...
हव तितकं.....
........
समोर काहीही 
दिसत नसलं तरी 
त्याच्या विशालतेची जाणीव होत राहते...
ऐकू येत राहतो तो फक्त ..
त्याच्या मन पणातून माझ्या मनात 
हळुवार उतरू पाहणाऱ्या लाटांचा आवाज....
जो त्यावेळी 
लयबद्ध वाटतो मला खूप...
या लाटा घेऊन 
जातात सोबत 
दिवसभर साचलेली
बेचैनी .. हुरहूर.. आठवांची निर्माल्यं आणि नुकतीच
उमलू पाहणारी स्वप्न फुलं .... 
त्यानंतर मग समोर निरंतर पसरलेला समुद्र 
पूर्णपणे माझ्याआत उतरतो....
त्याच्या इतकी अथांगता नसेलही पण 
त्याच्या इतका खोलवर उतरत जातो मी 
माझ्यामध्ये ... .. 

-अजय

No comments:

Post a Comment