Saturday, October 4, 2014

पाऊस १८

पाऊस १८

नेमका ऑफ़ीस ला 
जायच्या वेळेसच सुरू होतो....

ट्रेकींग ला गेलो की 
मुद्दाम कुठेतरी लपून बसतो..

तो पडतोय म्हणून चहा ,
गरमा गरम भजींचा बेत बनवावा 
आणि तो गायब होतो.. 


रेनकोटचं ओझं घेऊन 
बाहेर पडतो 
आणि सगळीकडे तो 
उन्ह पसरून देतो... 

बस एवढंच.. 

फ़क्त एवढंच ..! 

बाकी तसा 
पाऊस शहाणा आहे.. !! 

-अजय

पाऊस १७

पाऊस १७

मग पुन्हा आभाळ भरून येतं.... 
...
..
मग पाऊस येतो.... 
...
..
मग गार वारा येतो... 
..
..
मग सर्दी येते... 
..
..
मग शिंक येते...
..
..
मग डॉक्टर येतो... 

वाफ़ घ्यायला सांगतो... 
...
..
ती वाफ़ वर आकाशात जाते.......
आणि.......... 
..
..
आणि...........................​........
......................​....
.......... .............
.................​............
...............मग पुन्हा आभाळ भरून येतं.... 
मग पाऊस येतो..........................​....... 

-अजय

पाऊस १६

पाऊस १६

पावसामध्ये हरवलेलं मन...
.............
............
...
आणि मनामध्ये हरवलेला पाऊस..
......................
........​.............
.................​....
..........................​.
यांचा थांग कधीच लागत नाही...!!

-अजय

पाऊस १५

पाऊस १५

बाहेर कोसळणारा चहा.. 
घरात उकळणारा पाऊस.. ! 
खिडकीभोवती भिरभिरणार्या कविता.. 
वहीमध्ये घुसमटणारं वारं... 
आकाशामध्ये चमकून जाणारं मन.. 
डोळ्यामध्ये विझत जाणारी वीज..
अंगणामध्ये दरवळणार्या आठवणी... 
मनामध्ये कुजबुजणारा मोगरा...
..
...छे....पाऊस चढलाय बहुतेक मला...

च्यायला.. पावसाची नशा वाईटच...!!!!!

-अजय

पाऊस १४

पाऊस १४

रात्रीच्या वेळी एखादं छान, नाजुक 
अंगाई गीत गायचं सोडून..
...
...
अखंड बडबडगीते सुरू 
केली आहेत 
या पावसाने...
..
..
अगदी ’ये रे ये रे पावसा’ पासून ते 
’सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का..’ ... 
एकदम 
ठेक्यात गातोय पठ्ठ्या...... ! 

-अजय

पाऊस १३

पाऊस १३

मनाच्या कप्प्यात 
कितीही 
व्यवस्थित 
घडी घालून ठेवला ना 

तरी रोज ...
.........
...........
..........​.........
.......................
.......​........

नव्यानेच 

उलघडत जातो...........

...... हा पाऊस ..!!!!!!!!!!!!

-अजय

पाऊस १२

पाऊस १२


आभाळ भरून आलं की
घट्ट येवून बिलगतेस
तू मला 
आजही...
.
.
.
.
.

आपल्या श्वासांची 
लय पकडत
मग ................
...
..

एकसंध
बरसत 
राहतो

वेडा 
पाऊसही....

-अजय

पाऊस ११

पाऊस ११

पा...ऊ...स म्हणजे काय?

खर तर आपल्या मन रंगाप्रमाणे 
....
..
तो बदलत जातो नेहमीच..

कधी तो खूप हळवा वाटतो.. 

तर कधी रोमॅंटीक.......

पा... ऊ.... स...... 

खर तर फ़क्त 
तीन अक्षरांनी बनलेला शब्द...

म्हणूनच...
पाऊस.... म्हणजे.. कधी
जणू......

पा... ऊलवाट
ऊ ....री
स ...सलणारी... !!!!!

तर कधी पाऊस म्हणजे
जणू......

पा ...रिजातकापरी
ऊ ...मलून आलेली
स... खी... !!!!!!
..
..
......

-अजय

पाऊस १०

पाऊस १० 


मग पुन्हा आभाळ भरून येतं.... 
.......
.....
मग पाऊस येतो.... 
.....
.....
मग गार वारा येतो... 
......
.......
मग सर्दी येते... 
......
......
......
मग शिंक येते...

.......
......
.......
मग डॉक्टर येतो... 
...
...
वाफ़ घ्यायला सांगतो... 

ती वाफ़ वर आकाशात जाते.......
.....
.....
....
आणि.....
..... आणि..... मग पुन्हा 
......
.....

आभाळ भरून येतं.... 
....
....
.....
मग पाऊस येतो..................................... ......

-अजय

पाऊस ९

पाऊस ९

झालो सुद्धा असतो मी
पाऊस..

प्रश्न तो नव्हताच मुळी...
.
.
.
.
.
.फ़क्त एकदाच
तू चिंब भिजायला 
यायला हवं होतस..

-अजय

पाऊस ८

पाऊस ८

पाऊस आला..... 
रस्त्यांवरती................. 
झाडांवरती .. ........
...... कौलांवरती अलगद पसरला..

अलवार .. अल्लद ..
.पाऊस आला.. !!!!!!!

पाऊस हसला... 
निशिगंधाला,...... 
प्राजक्ताला... ........
........
खिडकीजवळ आणिक तुला

पाहून वेडा....
.... लाडीक हसला... !!!!!

पाऊस रमला...
पाना-फ़ुलांत...........
पांढर धुक्यांत.......
दर्या खोर्यांत.......
तुझ्या- माझ्यात...

आणि कधी स्वत:त रमला.... !!!!!!

पाऊस म्हटला.... 
बाहेर पड.... 
चिंब भिज......
भिजत रहा..................

भिजता भिजता एक दिवस..... 
.
.
.
स्वत:च पाऊस होवून जा... ! 

-अजय

पाऊस ७

पाऊस ७

नेमका ऑफ़ीस ला 
जायच्या वेळेसच 
सुरू होतो...
..........
........
.ट्रेकींग ला गेलो की 
मुद्दाम 
कुठेतरी लपून बसतो..
...............
...........
तो पडतोय म्हणून 
चहा ,गरमा गरम भजींचा 
बेत बनवावा आणि 

तो गायब होतो..
.......
.....
रेनकोटचं ओझं 
घेऊन बाहेर पडतो 
आणि सगळीकडे तो 

उन्ह पसरून देतो...
...................
................
...
बस एवढंच.. 
.
.
.
फ़क्त एवढंच ..!

बाकी तसा 
पाऊस शहाणा आहे.. !! :)

-अजय

पाऊस ६

पाऊस ६

सगळं काही विसरलीस म्हणतेयस ना..
ठीक आहे.. ठीक आहे... 
हरकत नाही....
..
...
पण एक सांगु का..
नुकताच पाऊस 
पडून गेलाय...
....
...
हवेत गारवा 
पसरलाय...
....
...
सगळा परिसर 
हिरवागार
झालाय...
.......
पाना-पानात.. 
फ़ुला फ़ुलांत..
पाऊस विरघळून
गेलाय....
...
...
.......
तेव्हा
शक्यतो बाहेर
पडू नकोस..
.
.
.
.
.
.
.
उगाच पुन्हा
माझी आठवण येईल...

-अजय

पाऊस ५

पाऊस ५

पावसाने भरलेल्या आभाळाकडे
ग~लरीतून एकटक 
बघत ती पुटपुटली,
’आज काहीही होवू दे पण
चंद्रकोर पाहिल्याशिवाय 
मी झोपणार नाही... !’

हसू आवरत खुर्चीतून उठत मी म्हटलं,
’मला तर झोप येत आहे खूप..’,

तर चिडली... नजर आभाळाकडेच
खिळलेली... म्ह्टली,
"हसतोस काय.. 
मी आज चंद्रकोर पाहणारच.. समोरचे काळे ढग जरा
पुढे गेले की दिसेलच.... ,
तुला नाही कळणार काही,.. जा तू.. ..."
.
.

’अग हो हो.. झोपतो मी
फ़क्त एकदाच इकडे 
बघ तरी खरं...
.
.
.
.
.
.

.
.
.
मी माझी चंद्रकोर 
पाहिल्याशिवाय
कधीच झोपत नाही....!

-अजय

पाऊस ४

पाऊस ४


पावसाचं हे एक बरं असतं.... !!

मनाला पाहिजे तेव्हा यायचं... 

ढगांमध्ये लपायचं.. 
धुक्यावरती निजायचं.... 

कधी बरसायचं 
बेभान होवून तर कधी 
झिमझिम गाणं गुणगुणत 
अलगद पसरायचं..

फ़ांद्या फ़ांद्यावर झुलायचं... 
वाऱ्यावरती डुलायचं.. 
हिरव्या हिरव्या गालिच्यावर 
मोती बनत उतरायचं.....................

...................................
..................
पाऊस...!!!

............................
....
च्यायला!!!! 
ठरवलयं मीही .. 

एकदातरी पाऊस व्हायचं.... !! :)

-अजय

पाऊस ३

पाऊस ३

खिडकीत उभा असतो मी एकटाच....
कितीही नाही म्हटलं 
तरी वाहु लागतात 
मनपटलावर तुझ्या आठवणी...
जितका वर यायचा प्रयत्न करतो मी
तितकाच खोल खोल बुडत राहतो...

आणि तशातच 
माझ्या एकलेपणाची लय पकडत,
बाहेर एकसंध बरसत राहतो 
पाऊस............ !!!!!!!!!!

बघ.. तुझ्या आठवणी इतक्या तीव्र 
आहेत की
आकाश सुध्दा 

ओघळत ओघळत

खाली येतं..... !!


-अजय

पाऊस २

पाऊस २.

’इतकं सुध्दा रागावू नये अगं’, तो म्हणाला होता तिला
पण ती पाठ फ़िरवून बसली.. 
तिने त्याच काहीच ऐकलं नाही..

मग कुणालाच काहीच न सांगता....

तो गेला निघून दूर.... 

कायमचा...
.
.
.
.
.
.
.
.
.
आणि लोकं म्हणतात आपलं उगाच की...,


global warming मुळे पाऊस पडत नाही हल्ली ... !

-अजय

पाऊस..

पाऊस..

दारावर बेल वाजली..

दार उघडून पाहतो तर बाहेर
कुणीच नव्हतं..
फ़क्त जोराचं वारं सुटलं होतं..
..
..
थोड्यावेळाने पुन्हा बेलचा आवाज..

दार उघडलं.. .. बाहेर कुणीच नाही...

फ़क्त... विजांचा कडकडाट

वैतागलो.. कोण त्रास देतोय कळेना..

खुर्चीत येवून बसतो न बसतो
तोच पुन्हा बेल वाजली..

आता मात्र चिडत दार उघडलं...
"कोण आहे रे? समोर ये.. " ओरडलो
पण कुणीच उत्तर दिलं नाही..

बाहेर भरून आलेले दिसत होते
फ़क्त काळेकुट्ट ढग..

विचार करत करत आत येवून बसलो
आणि पुन्हा बेलचा आवाज...

आणि एकदम लक्षात आलं..
हसत हसत तिला आवाज दिला..
..
..
..
..

"अगं दार उघड बाहेर येवून...

तुला पाहिल्याशिवाय
बरसायचा नाही पठ्ठ्या...!! :)

-अजय

स्वप्न ९७

स्वप्न ९७


अंगणामधली तुळस.......,

उंबर्यामध्ये 
अडखळणार्या आठवणी,,

खिडकीत 
व्याकुळलेला वारा..,

उशीखालची 
स्वप्ने...
..
..
खरं तर

सगळेच 
शुन्यात हरवलेले.....
...
....
प्रत्येक जण 
म्हणतोय हेच...
.
.
.
.
.
.
तू लवकर
घरी

परत ये........

-अजय

स्वप्न ९६

स्वप्न ९६


आठवणींचं येणं जाणं 
उंबऱ्याचं थरथरणं.....
संध्याकाळची हुरहूर..
मनामध्ये काहूर.... सुरूच...

भरून येणारं आभाळ..
त्यात स्वत:ला मिटून घेणारं उन्ह....
भिजलेल्या मनावरती
दरवळणारी पाऊलखूण...

दबकत येणारी रात्र....
सोबत झिमझिमतं चांदणं 
रातराणीची उधळण..
अन पापण्यांचं कुजबूजणं...
सुरूच...

मिटलेल्या आयुष्यावर
स्वप्नांची नशा...
पहाटेच्या फ़ुलावरती
उमलणाऱ्या आशा...
..............
.................................
.................
... 
खरतर सगळं 
काही सुरूच आहे

थांबलोय फ़क्त मी... 

लवकर ये....

अंतर खूप वाढत चाललयं..

-अजय

स्वप्न ९५

स्वप्न ९५ 

अगदी उंचच उंच...
आभाळाला भिडणाऱ्या...
....आभाळाच्या पार घेऊन जाणाऱ्या
स्वप्न पायऱ्या 
घेवून येते ही रात्र.... !!

ठरवतो मग मीही .. 
आज आभाळ गाठायचचं...!!
एकेक स्वप्न पायरी 
मागे सारत सारत 
जात राहतो पुढे.......
..............
आभाळ अगदी जवळ दिसू लागतं.. 
हाताच्या अंतरावर... 
....................
आणि तेवढ्यात 
’तुझी’ स्वप्न पायरी येते..
आणि पाय थबकतात...
बसून राहतो मग तिथेच....
..
खर तर अगदी 
दोन पायर्यांवर असतं आभाळ...
पण

काय करू म्हणा त्याचंतरी 
.
.
.
तुझ्याशिवाय...

-अजय

स्वप्न ९४

स्वप्न ९४


आज बराच वेळ बसून होतो 
समुद्र किनार्यावर... एकटाच
"तिच्या" कपाळावर दिसायची ना 
तशीच उगवली होती आज चंद्रकोर आभाळात...

खूप वेळाने घराच्या दिशेने निघालो... 
जवळ पोहचल्यावर पाहतो तर काय दार उघडच....
घरात गेलो तर सगळं घर अस्ताव्यस्त पडलं होतं...
घरभर जपून ठेवलेल्या 
तुझ्या असंख्य आठवणी...,
वही मध्ये लपून बसलेल्या कविता.... 
उशीखाली फ़ुलणारी
स्वप्ने... 
सगळं काही गायब झालं होत... 

तु आहेस याची जाणीव करून देणार्या 
बर्याच गोष्टी दिसत नव्हत्या..

कुणी केली चोरी काहीच कळेना.. काहीच सुचेनास झालं... 

एकदम आठवलं आणि 
पळत पळत खिडकीपाशी पोचलो... 

भीत भीत खिडकी उघडली..

....
...

सभोवार हळुवार गंध पसरत,

रातराणी फ़ुलून आली होती आजही 
नेहमीसारखीच.... 


पाहिलं आणि जिवात जीव आला माझ्या...

हायसं वाटलं..
.
.
.
.
.
.
शेवटी आम्हा दोघांनाच पक्का विश्वास आहे 
अजुनही..


की तू परत येशील.. नक्की..


-अजय

स्वप्न ९३

स्वप्न ९३


दिवसभर मौनामध्ये झाकोळलेलं 

असतं मन...

ते बोलकं होतं फ़क्त स्वप्नांमध्ये.....

तिथे तुझ्याशी मनभरुन भेट होते..

कधी लपत छपत तर कधी थेट होते...

मनातलं सगळं अगदी सगळं तुझ्याशी बोलतो...

तुही शब्द न शब्द मन लावून ऐकतेस.... 

पण त्यावर तू बोलत मात्र काहीच नाहीस..

मी वावरतो.. हुरहुरतो.....

सगळीकडे शांतता पसरली की 
.
.

फ़क्त हसतेस......
.
.
स्वप्नभर बागडतेस....
.
.
.

त्यानंतर मग 
निघून जात असताना तू,

फ़क्त
हताश होवून पाहत राहतो तुझ्याकडे...

आणि अगदी तेव्हाच..

जाता जाता दोन क्षण 
.
थांबत .. मागे वळून पाहत

तू विचारतेस...
.
.
.
.

"उद्याही भेटशील ना नक्की !! "




-अजय