Saturday, October 4, 2014

स्वप्न ६०

स्वप्न ६०

आज दुपारी
पाऊस पडला 
मुसळधार..
खर तर भिजायच 
अस ठरवल होत
पण पाय 
अडखळले 
उंबरठ्याजवळच...
....
..
सोबत तू 
नव्हतीस..
....
...
बसून राहीलो 
पावसाकडे बघत फ़क्त..
....
...
..
हाच पाऊस 
पुन्हा रात्री स्वप्नात आला...
एकसंध बरसू लागला...
दुपारी का नाही भिजायला आलास..
म्हणत ओरडला मला. बाहेर बोलावू लागला
पण मी स्वप्नात 
देखील नाही म्हणालो...
.
..
..
यावर तो फ़क्त हसला..
म्हणाला,
"तुम्ही दोघेही वेडे आहात.. 
आता तिच्या स्वप्नातूनच 
येतोय मी..
तीसुध्दा भिजली नाही आज..
....
....
.तू सोबत नाहीयेस म्हणून...
..
....

म्हणजे यावेळेस 
मीसुध्दा 
कोरडाच राहणार 
तर"

-अजय

No comments:

Post a Comment