Saturday, October 4, 2014

स्वप्न ८१

स्वप्न ८१ 

वळणं वळणं घेत येतात स्वप्ने 
मी दार उघडत स्वागत करतो...
'या.. आत या .. कसे आहात..??'
स्वप्ने हसतात .. म्हणतात..
"मजेत...!!! थोड वय झालंय
पण तुझ्याकडे यायची वेळ ..
इथे पोचायला लागणारं अंतर ... पोचायचे रस्ते...
सगळं अंगवळणी पडलंय आता.......
त्यामुळे 
त्रास नाही होत हल्ली जास्त....
तू कसायेस.. कसा गेला दिवस... ?"
.....
......
मी जवळ जाऊन बसत उत्तरतो..
'नेहमीसारखाच...
. सरत नाही म्हणता म्हणता
.........
.......
कुठे हरवला 
कळलसुद्धा नाही 
बर!!!!! ते राहू दे !!! 
ती भेटली का आज ? कशी आहे?"
.........
.........
मी अस विचारलं आणि स्वप्न चिडली ..
उठत म्हणाली...
"किती वेळा सांगितलं तुला तिचा विषय 
काढत जाऊ नकोस .. तिची एकदा आठवण आली
कि मग ..... जाता जात नाही ... 
पहाट व्हायला येते तरी वाटत मग रात्र सरू नये... 
दिवस उगवला कि 
तू निघून जातोस रे ..
पण पुन्हा रात्रीची वाट पाहताना 
काय हालत होते आम्हालाच ठाऊक !!!!!..
पूर्वीसारखी दगदग नाही सहन 
होत आजकाल...
तेही 
विनाकारण"

-अजय

No comments:

Post a Comment