Saturday, October 4, 2014

स्वप्न ७९

स्वप्न ७९



तिने विचारलं 

कसा आहेस...?

काहीच बोललो नाही यावर मी ...

मनात म्हटलं 

"आहे अजून .!!!!!!!!" . हेही नशीबचं !!!

डोळे भरून पाहत म्हणाली ....

अगदी आहे तसाच आहेस रे अजूनही ..!!!!

फक्त हसलो ... 

मनात म्हटलं 

"ओळखलस!!!! " हेही नशीबचं !!! 

आता थोडीशी चिडली .. म्हणाली 

बोलणार आहेस का नाहीस तू ????

नेहमी बोलू पाहणारे डोळे बंद करत 

मनात म्हटलं 

"उरल नाही काहीच बोलायला !!! " हेही नशीबचं !!!

मग तिनेच विषय काढला..

अजूनही लिहितोस का रे???? .. ऐकव ना काहीतरी 

दोन क्षण शांत 

पाहत राहिलो तिच्याकडे 

मनात म्हटलं 

"हल्ली सुचत नाही !!!!!!" हेही नशीबचं !!! 

काहीवेळ मग 

सगळीकडे शांतता भरून राहिली 

का कुणास ठाऊक 

पण डोळे भरून आले

तिचे ......

मनात म्हटलं

"भरून आले तरी ओघळले नाहीत !!!!" हेही नशीबचं !!!



पण खर सांगायचं तर तिची 

एकदाच भेट व्हावी अशी 

मनापासून इच्छा होती .. 

काहीतरी अपूर्ण राहिलं आहे... 

अर्धवट राहिलंय दोघांमध्ये...

वाटायचं स्वप्नात का होईना

पण समोर यावी... 

..........

.... 

"प्रत्यक्ष भेट घडली !!!!! " हेही नशीबचं !!! 

या विचारानेच हसू आलं ...

काय झाल? हसतोयस काय? 

काही नाही .. सहजच... !!!!!... 

मी उत्तरलो...

...

खूप वेळाने उठली... 

निघत निघत म्हणाली 

जाते रे.... !!!!!!

आणि मग मागे 

वळून न पाहता निघून गेली 

दूरवर दिसेनाशी होईपर्यंत पाहत होतो

तिच्याकडे एकटक .... एकसंध 

मनात म्हटलं...

.

.

.

"येते रे म्हणाली नाही !!!!" हेही नशीबचं !!!



-अजय

No comments:

Post a Comment