Saturday, October 4, 2014

स्वप्न ७४

स्वप्न ७४

नाव भरकटू नये म्हणून
दिशादर्शक असतो तसा
.....
अगदी तसाच
माझी रात्र हल्ली
घेवून येते 
स्वप्न दर्शक !!!!

कारण बर्याचदा ही स्वप्ने येतात
आणि मग रात्र भरकटत जाते
त्यात..
आणि पर्यायाने मीसुध्दा.....
.................
चुकीच्या दिशेने वाहत चाललोय
माहीत असूनही......
पुढे पुढे जात ठाव घेण्याचा मोह
आवरता येत नाही.... दोघांनाही...

शेवटी दिवसांच्या बेटांवर थांबत....
विसावत अव्याहत प्रवास सुरू राहतो..

बराच काळ लोटला की कळत 
........
जिथून प्रवास सुरू झाला होता

तिथेच पोचलोय..... आणि मग सार काही
शांत होवून जात पहिल्यासारखं..... !!!

पॄथ्वी गोल आहे हेही एक बरच झालं म्हणायचं...


-अजय

No comments:

Post a Comment