Saturday, October 4, 2014

स्वप्न ४२

स्वप्न ४२

रात्री उशीरा जेव्हा ऑफ़ीसमधून 
घरी परतू लागतो,
तेव्हा गाडीवर मागे बसून,
ही स्वप्ने सांगू लागतात मला,
....
माझ्याच घराचा पत्ता...
...
हा आता उजवीकडे..
..
इथून डावीकडे !!!!
....
..
मी गाडीचा वेग हलकासा
वाढवताच,
मला घट्ट पकडत,
"अरे हळू चालव रे!!! भिती वाटते"
म्हणत बिलगतात..
..
..
..
क्षणोक्षणी ही स्वप्ने
तुझी आठवण करून देतात..
..
..
तुझ्य़ा वार्यावर उडणार्या, मल स्पर्शून जाणार्या
बटांचे ते व्रण 
..
...
..
रोज नव्याने कोरतात ही स्वप्ने

-अजय

No comments:

Post a Comment