Saturday, October 4, 2014

स्वप्न ७६

स्वप्न ७६

कितीही बंदिस्त करून
घेतल स्वत:ला
तरीही.....
....
......
आठवांच्या
कौलारांतून
टप टप 
गळत 
राहतात स्वप्नं !!!!
.....
........

जास्त वेळ तग 
धरता येत नाही
अशावेळी........
जवळ 
असलेल्या 
या मनछत्रीला..
आणि मग...
.
.
.
.
.
.
.
त्यात 
भिजण्यावाचून 
गत्यंतर उरत नाही
मला

-अजय

No comments:

Post a Comment