Saturday, October 4, 2014

स्वप्न ३८

स्वप्न ३८

आज स्वप्नात तिचा फ़ोन आला..

ती: hi !! कसा आहेस?
मी : hi !! आता तुलाच फोन करणार होतो...
ती: हो का?? पटलच मला....
मी: अग खरच.. तुझी शपथ !!!!!!!!!!!!
ती : घे घे... खोटी शपथ घे आणि घालव तू मला वर.. 
मी: (मिष्कीलपणे) हट.....ती आशा मी सोडून दिली आहे... 
ती: अजू, तू पण ना... बाकी काय म्हणतोस..
मी: बाकी काय म्हणू ??
ती: काही म्हणायच म्हण.. काही न म्हणायच म्हण.... (नाजूक हास्य.... 
हसणं सुध्दा नाजुक असत हे मलाही आता आताच कळलय..... )
ती: झाली तयारी उद्याच्या program ची..?
मी : हो सुध्दा आणि नाही सुध्दा.. थोड टेन्शन आल होत पण तुझा फोन आला आणि आता टेन्शन दूर पळून गेल.
ती : आहाहा...
मी: अग खरच .. बघ अस असतं.... मनापासून बोलत असलो की तुला पटतच नाही.. 
ती : अगदी !!!! बर.. पटल मला.. (पुन्हा नाजूक हास्य)
मी : आणि हो उद्या लवकर ये.. ५:३० ल program सुरु होणार आहे. 
ती: नक्की येईन मी..
मी: चला बर झाल.. नाहीतर stage ची साफ़सफ़ाई करायला कुणीच नव्हतं..
ती: अजू !!!!! तू पण ना !!!! जा... बोलू नकोस माझ्याशी.. 
मी: (मिष्कीलपणे) काश... हे जमल असत तर... चांगल्या गोष्टी अंगवळणी पडत नाहीत अगं.. 
ती: (रागाने.. नाही लाडीक रागाने....) जा !!!!! मी येणारच नाही उद्या.... 
मी: ये अस काय लगेच... तू फ़क्त ये.. नाहीतर program सुरू नाही करणार मी.. 
ती: आहाहा.... तू ना मला धड चिडूसुध्दा देत नाहीस.. अस काही बोलतोस मध्येच....
मी: .......

गजर झाला आणि मला जाग आली....
बिछान्यावरून उठून तिला फोन लावणार तोच फोन आला तिचा..

ती: hi ! कसा आहेस?
मी : hi !! आता तुलाच फोन करणार होतो...
ती: हो का?? पटलच मला....
..............................
................................
.................................

-अजय

No comments:

Post a Comment