Saturday, October 4, 2014

स्वप्न ७३

स्वप्न ७३

ढगांचा गडगडाट.....
भरून आलेलं आभाळ..
संध्याकाळची वेळ...
नेमकं रेडिओवर
एखादं जुनं रफ़ीचं गाणं....
पावसाची अचानक सुरू झालेली
सर....
खिडकीतून निर्मनुष्य पण
जिवंत 
दिसणारा रस्ता...
भिजलेली झाडं.....
...
अशावेळी घरात असूनही
चिंब भिजून जातं मन...

आणि 
मग कितीही नाही म्हटल
तरी येवून जातेच.. तुझ्या
आठवणींची झड...

डोळे भरून बघत बसतो मी
बाहेरचा पाऊस 
आणि तो
माझ्या आतला...
बरसत राहतो...

रिमझिम रिमझिम.....

रिमझिम रिमझिम..
एकसंध...एकचित्त.....

यात माझी 
लय मात्र हरवून
जाते परत..
..
..
हल्ली पाऊस म्हणूनच टाळ्तो मी
दूर ठेवायच्या म्हटल तरी मग
उफ़ाळून येतातच 
तुझ्या आठवणी....
....
तरीही.. या आठवणींना
टाळणं शक्य तरी होत
पण 
पाऊल न वाजवता
..नकळत येणारी
डोळ्यांत तरळत
राहणारी स्वप्ने 
नाही अडवता येत....
.....
डोळ्यांत 
भरून राहतात ती
आणि मी मात्र
ओघळत राहतो
सावरून घेतलेल्या
आयुष्यावर.....
............

-अजय

No comments:

Post a Comment