Saturday, October 4, 2014

स्वप्न ४८

स्वप्न ४८

दुपारची वेळ. मंदिरात कुणीच नव्हत..
तडक देवघरासमोर जावून उभा राहिलो.
"हे देवा. आता खूप झाल..
खूप जगलो स्वप्नांच्या दुनियेत..
आता मला स्वप्नांच्या दुनियेत रमायचं नाहिये..
पुर्ण होत नाहीतच अशी स्वप्नेच 
नाही बघायची आता...
खर तर मला स्वप्नच नकोत 
देवा, या स्वप्नांना दूर ने 
माझ्यापासून 
कायमचं....,
तुला २१ मोदकांचा नैवेद्य देईन..",
अस म्हणत चांगली २१ वेळा 
घंटा वाजवली.
...
...
देवघरातून बाप्पाचा 
आवाज आला,
"कोण आहे रे? 
च्यायाला माझी झोपमोड केली.
कधी नव्हे ते बर्याच 
दिवसांनी 
.
.
.
सुंदर 
स्वप्नं 
पडल होतं."
..
..
-अजय

No comments:

Post a Comment