Saturday, October 4, 2014

स्वप्न ५३

स्वप्न ५३

सकाळ झाली की 
आपली वस्ती हलवतात ही स्वप्ने.. नाहीशी होतात..
मागे उरतात त्या फ़क्त निघून गेलेल्या.. हळुहळू पुसट
होत गेलेल्या स्वप्न-खूणा..
दिवसभर शोध घेऊनही हाती काहीच लागत नाही
मग अशावेळी रात्रीपेक्षाही 
दिवस खोटा वाटू लागतो..
मनाच्या तळाशी जपलेल्या
त्या स्वप्नील
क्षणांना शेवटी 
पेटवून देतो... 
सगळ संपल 
अस वाटत असतानाच
पुन्हा रात्र येते आणि
पुन्हा स्वप्ने वस्तीला येतात..
शेवटी कंटाळलो.. 
या स्वप्नांना
बेकायदेशीर ठरवत 
मोडून काढायच ठरवल..
बर्याच रात्री जागवल्या
पण...
.
.
.
.
रात्र होताच
त्याच ठिकाणी 
आधी पेक्षाही जास्त उंचीच्या
स्वप्न इमारती 
नव्याने कशा काय उभ्या राहत
आहेत 
हेच कळत नाहीये...

-अजय

No comments:

Post a Comment