Saturday, October 4, 2014

स्वप्न ७८

स्वप्न ७८ 

नव्हतेच माझे असे काही कधी 

हे असेच हल्ली स्पष्ट स्पष्ट 

बोलतो मी माझ्याशी..

लपंडाव नसतो हल्ली कुणाशीच 

मग तो भूतकाळ असो .. वा वर्तमानकाळ 

...... 

तू होतीस... एक गोड आठवण 

आणि आता आयुष्यभर 

फक्त ह्या आठवणीच दरवळत 

राहणार आहेत माझ्या चोहीकडे....

हे ठामपणे पटवून 

दिलय स्वताला...

... .

.

आणि एक सांगू का.....



हल्ली 

तुझ्या माझ्यातल अंतर 

अगदी समंजसपणे 

पाळू लागली आहेत 

ही स्वप्नेदेखील ...

- अजय

No comments:

Post a Comment