Saturday, October 4, 2014

स्वप्न ४३

स्वप्न ४३

बाहेर एकसंध पडणारा पाऊस
झोपाळ्यावर बसून
पाहात बसायचीस मग्न होऊन..
अगदी भान हरपून...
काय तुला वेड होत या 
पावसाच कुणास ठाऊक...
मी जवळ येताच
मला घट्ट बिलगायचीस..
वाराही शहारायचा..
मग म्हणायचीस,
हा क्षण इथेच थांबावा.
पुढे सरकूच नये...
मी तुला आणखी जवळ 
घेत हसत
’तथास्तु’ म्हणायचो..
जातो म्हणता म्हणता
मग पाऊसही रेंगाळायचा..
झुल्याच्या झुलव्याबरोबर
आभाळगाणं गुणगुणत रहायचा.
..
...
..
ते क्षण तर
कापरासारखे उडून गेले
....
तरी
.
आजही
ही स्वप्ने
येताना सोबत 
पाऊस घेऊन येतात..
..
..
पाऊस म्हटलं की 
तुझ येण ही आलच.

आणि मग 
माझही आपसुकच....

-अजय

No comments:

Post a Comment