Saturday, October 4, 2014

स्वप्न ६९

स्वप्न ६९

आज बाप्पाचे विसर्जन
करताना राहून राहून
कालच स्वप्न आठवत होत...
........
............................
"बापा पुढच्या वर्षी लवकर ये
म्हटल आणि
जाता जाता
बाप्पा
दोन क्षण थांबले
.....
जवळ येवून खांद्यावरती
हात ठेवत म्हटले

’नक्की येईन........
पण..

पण....
पुढच्या वर्षी येईन तेव्हा
सोबट ’ती’ सुध्दा दिसली पाहिजे
......
१० दिवस येतो खरा
पण हुरहूर उगा लागून राहते..
कधीतरी बोल अरे......
मी चमत्कार करू 
का म्हटल
तर तेही तुला चालत नाही..
तेव्हा बोलून बघ...
स्वत:साठी नाही
तिच्यासाठी नाही.
.. फ़क्त
माझ्यासाठी....
एकदाच..
............
.........
तुझी माझ्यावर...
जेवढी भक्ती आहे ना
.....
......
तेवढीच...
माझी 
तुझ्या प्रेमावर
नितांत श्रध्दा आहे...
एवढ मागणं पुर्ण कर....."

सोड आता बाप्पाला पाण्यात,
मागून
बाबा म्हणाले.. आणि स्वप्नांच्या
आठवणीतून बाहेर आलो..

"नक्की बोलेन..!!" 
नकळत पुटपुटलो....

-अजय

No comments:

Post a Comment