Tuesday, December 21, 2010

स्वप्न ५८



ह्रूदयात प्रेमाच उभ राहीलय

एक मंदिर.

..

..

स्वप्नांचा गाभारा..

..

गाभार्यात दरवळत

राहाणार्या आठवणी...



समईत निरंतर

तेवत राहणारे

मी जपून ठेवलेले ,

तुझे-माझे

सोनेरी क्षण...

...

एका कमंडलुत

मॄगजळागत आनंद देवून जाणार

भासामॄत...

...

निरंजनाची ज्योत शांत

तेवत राहावी

तशी मनात

भरून राहते प्रसन्नता

..

इथे अर्पण केलय

मी माझं मनफ़ुल.....

..

.

आता आयुष्यभर

या मंदिराचा

पुजारी बनून राहायचय मला ..



-अजय

स्वप्न ५१



आज अगदी सकाळीच चक्क चक्क ती माझ्या घरी.

मी देवघरात पूजा करत होतो, अगदी शेजारी येवून बसली

सत्यनारायणाच्या पूजेत जस भटजीबुवा

हाताला हात लावायला सांगतात

तसा..अगदी तसा हात धरला माझा

क्षणभर मीच घाबरलो..तिच्यातला तो धीटपणा पाहून गोंधळलो

"अगं आई बघेल", म्हटल तर

"बघू दे!! होणारी सून आहे त्यांची मी..", तिचं निर्धास्त उत्तर....

पूजा आटोपून खोली मध्ये जातो न जातो

तोच ती पुन्हा समोर हजर..

जराशी लाजत..डोक्यावर ओढणी घेत,

"अहो चहा आणलाय आपल्यासाठी. इकडून घेणं कराव.."

"अगं हळू कुणीतरी ऐकेल.."

"इकडून अस रागावू नये..." हसत हसत तिच प्रत्युत्तर....

मी चहाच कप बाजूला ठेवत तिला जवळ ओढल

आता मात्र तिच्या चेहर्यावरचे धीट भाव शर्मिले होत होत

माझ्या कुशीत शहारू लागले..

अरे सोड. आई येतील..

येऊ दे ना. बायको आहेस होणारी माझी तू..

गप्प.. अरे कुणीतरी पाहील खरच. सोड ना..

नाही सोडणार...

सोड...

नाही..."



’अरे नाही काय उठ ,८ वाजत आले’,

आईच्या आवाजाने दचकून जागा झालो..



-अजय

स्वप्न ४३



बाहेर एकसंध पडणारा पाऊस

झोपाळ्यावर बसून

पाहात बसायचीस मग्न होऊन..

अगदी भान हरपून...

काय तुला वेड होत या

पावसाच कुणास ठाऊक...

मी जवळ येताच

मला घट्ट बिलगायचीस..

वाराही शहारायचा..

मग म्हणायचीस,

हा क्षण इथेच थांबावा.

पुढे सरकूच नये...

मी तुला आणखी जवळ

घेत हसत

’तथास्तु’ म्हणायचो..

जातो म्हणता म्हणता

मग पाऊसही रेंगाळायचा..

झुल्याच्या झुलव्याबरोबर

आभाळगाणं गुणगुणत रहायचा.

..

...

..

ते क्षण तर

कापरासारखे उडून गेले

....

तरी

.

आजही

ही स्वप्ने

येताना सोबत

पाऊस घेऊन येतात..

..

..

पाऊस म्हटलं की

तुझ येण ही आलच.



आणि मग

माझही आपसुकच....



-अजय

स्वप्न ९



स्वप्न एके स्वप्न

स्वप्न दुणे स्वप्न

स्वप्न त्रिक स्वप्न

.

.

.

.स्वप्न दाहे स्वप्न...



सगळीकडे स्वप्नच स्वप्नं

भरून राहिली आहेत....



त्यामुळे हल्ली

कुठलही अवघड, कठीण, वास्तववादी गणित

सोडवायला घेतल तरी

मला आधीच माहीत असत

की उत्तर शेवटी



’स्वप्न" च येणार आहे.



-अजय


Monday, December 20, 2010

स्वप्न ४३

स्वप्न ४१




पाऊसही आज हळवा झालाय,



कालच्यासारखा बरसत नाहीये



वाराही तो शांत,गंभीर,



नेहमीसारखा धावत नाहीये......



स्वप्नेही आज हिरमुसलेली,

...

मनभरून बोलत नाहियेत...



आभाळही आज ओलं ओलं,



पाण्यावरती उमटत नाहीये..

.

.



सगळेच वेडे माझ्यासारखे,



खर सांगु?



त्यांनासुध्दा

.

.

.

.

तुझ्याशिवाय करमत नाहीये.....



-अजय

स्वप्न २७



हलका हलका

होत जाणारा

पाऊस...

चिंब भिजून....

शांत पहुडलेला,

रस्ता........

गार,

सैलावलेलं..

वारं...........

वडाच झाडं...

ऊबदार,

पारंब्या !!!!!!

चहाची

टपरी......

गरम झालेलं

आलं......

शांतपणे उकळत

असलेलं

दूध....

नखशिखांत

भिजलेला

मी......

.

.

सलग

चार

शिंका....

.

.

दोन कप

चहा....

...

..

पुन्हा

एक

स्वप्न !!!



-अजय

स्वप्न १८


"आ कर.. मोठा आ !!!

आता जीभ पाहू......

हमम...

श्वास घे.... पुन्हा एकदा....",

अस करत डॉक्टरांनी माझी

एकूण एक सगळी

स्वप्ने तपासली....

आणि मग बाहेर

येत मला म्हणाले,

"अरे उगाच काळजी करतोस...

काहीही झालेलं नाहीये

तुझ्या स्वप्नांना.....

सगळी अगदी १०० टक्के

निरोगी आहेत..

एकदम ठणठणीत !!!!

...

..

फ़क्त तू



धीर सोडू नकोस...



बघत राहा....



एक दिवस

नक्की पुर्ण होतील..."



-अजय

स्वप्न १७




किती दिवस अस गप्प राहणार..

मनाचे ..स्वप्नांचे खेळ

आत पुरे झाले!!!!!

आज तिला सगळं सगळं

बोलून टाकणार,

ठरवल अगदी मी पक्क.. 'मनाशी'....

आज सकाळपासून सगळच कस

छान..सुरळीत चालू आहे

ही संध्याकाळ सुध्दा आज

अगदी स्वप्नात पाहली होती तशीच..

स्वप्न तर नाही ना हे

म्हणून दोनवेळा

जोरात चिमटासुध्दा

काढून बघितला स्वत:ला....

.

तिच्या कपाळावरची चंद्रकोर

नेहमीप्रमाणे वेड लावणारी..

केसांमध्ये माळलेला गजरा..

स्वत:शीच लाजत .. मुरडत

तिच्या केसांना घट्ट

बिलगून बसला होता

"नशिबवान आहेस बेट्या."

मी म्हटल सुध्दा... मनातल्या मनात

"तू आज खूपच

सुंदर दिसत आहेस.." मी म्हणताच,

"तुला मी रोजच दिसते" अस लगेच उत्तरत...

तिचं ते

मिष्किल डोळे करत हसणं!!!!!!!!

मी पुन्हा घायाळ ..त्या अदेवर..

घायाळ होण्यातली मजा ती भेटल्यावर

कळली मला..

स्वत:ला सावरत.. भानावर आणत

मी तिच्यासमोर येऊन उभा राहिलो..

एका पायावर खाली बसत..

तिचा हात हातात घेत..

दोन क्षण डोळ्यात पहात.. म्हटल

"माझ्याशी लग्न करशील....

माझ पुर्णत्व तुझ्याशिवाय अपुर आहे..

आयुष्यातली सगळी सुखे

तुझ्या ओंजळीत आणून ठेवीन..

तेही अलगदपणे!!!

त्या सुखांचही ओझं

होऊ देणार नाही तुला..

....

.....

.....

.....



..

...



किर्र..

किर्र.. किर्र..

किर्र.......



च्यायला!!!!!! ७ वाजले....

आज पुन्हा उठायला

उशीर झाला....

उठता उठता चिमटा काढल्यावर

लाल झालेला हात पाहत..

स्वत:शीच

हसत मी कॉलेजला

जायच्या तयारीला लागलो..



-अजय

स्वप्नातलं घर.. तू आणि मी...



स्वप्नातलं घर.. तू आणि मी...



कोकण...............

टुमदार कौलारू घर...

ऐसपैस पडवी...

तिथे एक पाटाचा झोपाळा अगदी

तुला आवडतो ना तसाच...

घराच्या एका बाजुने

अंब्याची बाग..

दुसर्या बाजुने

एका रांगेत उभी असलेली

नारळाची झाडे. . . . .

अंगणात मध्ये एक तुळस...

बाजुने अंगणभर फ़ुललेली फ़ुलबाग..

मोगरा... प्राजक्त....

पण तू मोगर्यामध्ये रमलीस की

प्राजक्त हळहळायचा आणि

प्राजक्तामध्ये हरवून गेलीस की

मोगर्याला राग यायचा...

मग या दोघांचीही

समजुत काढायला ,

समजुतदार निशिगंध

सुध्दा तिथे हवाच...

घराभोवती एक लाकडी कुंपण...

कुंपणभर सजलेली ..नटलेली.. सदाफ़ुली

वरच्या मजल्यावरच्या

खोलीला समरुन

एक खिडकी..

आणि ती खिडकी उघडताच

समोर दिसणारा

निळाशार समुद्र....

आणि तो बघताना

नेहमी माझ्यासोबत तू...

पुन्हा समुद्र किनार्यावर

ते आपल शंख-शिंपले वेचत वेचत

वाळूवर पाऊल ठसे उमटवत

दूर-दूरवर चालत जाणं..

त्या पाऊल खूणा

पुसून टाकत

लाटांच ते फ़िदीफ़िदी हसणं...

आणि मग तुझा तो

त्यांच्यावरचा नकटा राग....

आणि मी मिठीत घेतल्यावर

तुझ्या माझ्यात

उतरत जाणारी ती

संध्याकाळ....

.

.

रोज सुर्यास्त होताना पाहणं..

लाल-केशरी रंगात रंगलेलं आभाळ..

त्यात हरवून जात

एकमेकांना बिलगून

बसलेलो तू आणि मी.....

..

..

..

स्वप्नातलं घर.. तू आणि मी.........



-अजय

स्वप्न ११


इकडून तिकडे येरझार्या घालतोय..

आज काहीही झाल तरी

तुझं एकसुध्दा स्वप्न

मी बघणार नाहीये...

मी ठरवलय

अगदी ठाम....पहिल्यांदाच

आज झोपतच नाही

त्यापेक्षा..

म्हणूनच बाहेर

येरझार्या घालतोय..

.

.

रात्री ३ वाजत आले

शेवटी सहज म्हणून

बेडरूम मध्ये आलो,

पाहतो तर................

तुझी असंख्य स्वप्ने

माझी वाट पाहून पाहून

बिछान्यावर निजून

गेली होती......

.

.

.

झोपेत सुध्दा किती सुंदर

दिसतात ही स्वप्नं.............!!!!!!!!!!

निर्मळ.. निरागस....

मी त्यांच्याकडे

बघत राहीलो फ़क्त..

माझी नजरसुध्दा

हलली नाही.....

....................

....................

....................

.....................



कधी सकाळ झाली

कळलच नाही...



-अजय

स्वप्न १०


लाल बुंद

चंद्र,

लाजलेली

सुर्यकोर,

एक अस्खलित

जांभई.

बोलणारी

फ़ुलं........

दिसणारे

गंध........

मोगर्याच्या

मनात

काही खुललेले

रंग..

सप्तरंगी

धुकं.....

त्यावर पांढरशुभ्र

इंद्रधनु..........

त्याच्या

टोकाला

मग माझं मन

फ़ुलपाखरू

होऊन..

...

...

पुन्हा एक स्वप्न..



-अजय

स्वप्न ८



"इन्किलाब जिंदाबाद.......!!"

"

इन्किलाब जिंदाबाद.......!!"

"

इन्किलाब जिंदाबाद.......!!"

"

इन्किलाब जिंदाबाद.......!!"

"





तुला प्रत्यक्षात बघून खूप दिवस झालेत..



तुझ्या स्वप्नांनी सुध्दा



असहकार चळवळ सुरू केली आहे बघ....

.

.......................................

.

.



.

.......................................

आता तरी येवून जा..





-अजय

स्वप्न २



आज सकाळी चहा पिताना मला हसू आवरेना...

त्यावर आई म्ह्टली सुध्दा की,

"अरे काय वेड लागलय का?

काय हसतोयस असा.. "...

आता काय सांगु आईला,

काल मला काय स्वप्न पडलेलं......



"भरून आलेल आभाळ....

गार वारा..

मग हलकेच सुरू झालेला,

मातीत भिजत गेलेला आणि

मग सगळीकडे दरवळत उठलेला पाऊस.

.घरात आज आम्ही दोघेच..

एकसंध ऐकू येणारी ती पावसाची रिमझिम,

ती ऐकताना मनाला अनाहुतपणे सापडलेली

तरल,मोहक लय..

अशात चहाची तल्लफ़..

मी तिला चहा कर म्हटलेल..

तिने "तूच कर. मलाही ठेव",उत्तर दिलेल..

मी खोटखोट चिडून पुन्हा एकदा सांगितल आणि तिच्याकडून पुन्हा तेच उत्तर आलेल..

हळूच गालातल्या गालात हसताना तिला मी चोरट्या नजरेने पाहीलेले......

मग मी खिडकीत येऊन उभा राहिलेलो..

डोळ्यात तो बेधुंद पाऊस आणि तिचा तो हवा हवासा वाटणारा खट्याळपणा अलवार साठवत गेलेलो...

ती सुध्दा मग माझ्या जवळ येऊन उभी राहिलेली..

आणि "अहाहा,काय भारी वाटतय असा हा पाऊस पहायला.. फ़क्त हातात चहाचा कप हवा होता बास....!!!" म्हणत हसलेली..

आता मात्र न राहावून मलासुध्दा हसू आलेल...

आणि मग ती अलगदपणे माझ्या मिठीत शिरलेली...

त्यानंतर दोघे मिळून चहा करायला गेलेलो.........................................

.................आणि नेमक तेव्हाच लक्षात आल

की घरामध्ये दूध संपलेल..

.

ती,मी आणि बाहेरचा पाऊस

त्या गॅस वर उकळणार्या चहाकडे पाहात स्वप्नभर हसलेलो......"



-अजय

नशा : 4


ती सुचली

..

...

ती रुचली

..

डोळ्यांतुन नितळत हलके



ओठांवर येवून बसली !!

...



ती दिसली

...

ती हसली

,,,



मग नजर गेली जिथवर



तिथवर हवेत बहरून आली !!



ती स्मरली

....

ती रडली

......



अडखळल्या पाऊलवाटा



अन जमिन जराशी हलली !!!



ती चिडली

...

ती म्हटली

....

न पिताच वेड्या तुजला



आज पुन्हा रे चढली.... !!



-अजय

नशा : 3

दु:ख झाल तर ते विसरण्यासाठी

दारू प्यायची म्हणजे ते कुठेतरी पळून जात

अस मित्र म्हणाला होता

म्हणून मग एक दिवस बसलो बाटली घेऊन..

एक पेग झाला

दोन पेग झाले..

पाहतो तर चक्क चक्क

दु:खच समोर येवून बसल

म्हणाल, भर माझ्यासाठीसुध्दा एक पेग..

मी घाबरलो..

भीत भीत ग्लास समोर धरला

त्याने गट्कन रिकामा केला..

मग तीन.. चार पेग झाले..

उकडायला लागल म्हणुन फ़ॅन सुरू केला

तर भिंत हलू लागली..

आरसा हलू लागला

कपाट हलू लागल...

समोर बसलेल दु:ख सुध्दा हलत होत..

त्याला चढली म्हणून ते

डुलत असाव बहुतेक...

विचाराने मी जोर जोरात हसलो..

साल्याला इतक्यात चढली सुध्दा...

मी शांत... स्तब्ध होतो..

अजून एक भरू क? आता मी चढ्या आवाजात

विचारल..

ते घाबरत घाबरत हो म्हणाल..

अजून दोन तीन पेग झाले..

आता तर टेबलही हलू लागल..

ग्लास हलू लागले..

बाटली हलू लागली..

दु:ख तर हलणार्या

खुर्चीवर झोकांडे घेऊ लागल

पण मी मात्र

अगदी शांत..

स्तब्ध ....

...

..

मला हसू आवरत नव्हत..



-अजय

नशा : 2

पुर्ण भरलेली बाटली..

आणि तिच्यासमोर

मी.................... पुर्ण रिकामा..



पेग वर पेग..



रात्र सरतेय..



शराब बाहेर

येऊ लागते

बाटलीतून.......



आणि मी

उतरत जातो

या बाटलीमध्ये....

..



पुरता आत

उतरलो की

मग ही शराब

झाकण

घट्ट लावते..

आणि बाटली फ़ेकून देते

..

समुद्रात

..

..



श्वास कोंडतोय..



माझी हलकीशी फ़ुंकर..



झाकण सैल..



हवा आत.. बरोबर पाणीसुध्दा



पाण्याचे बुडबुडे..



गटांगळ्या

..

..

बुडतोय...

..

.

बुडतोय...

...

...

बुडतोय.



.

.

बुडलो रे..



-अजय