Saturday, October 4, 2014

स्वप्न ५५

स्वप्न ५५

बाहेर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि
आत आपलं 
उगाचच झालेल भांडण..
खूप खूप भांडलेलो........
तू रडत 
रडत निघाली होतीस..
तू जाताना पाहून 
माझ्याही नकळत मी
तुला थांब म्हटलेल.
तुझा हात पकडत तुला अडवलेलं...
क्षणभर माझ्याकडे पाहिलस आणि
हुंदके देत माझ्या
मिठीत 
शिरलेलीस...
त्या मिठीत आपल 
भांडण कुठे विरघळून गेल 
ते कळल नव्हत 
दोघांनाही..
रडून रडून तुझे डोळे, 
नकटुलं नाक, 
ससुले गाल लाल होऊन गेलेले..
माझे डोळेही ओलावलेले....
मी sorry म्हणत तुला घट्ट जवळ घेतलेल.
तुही मुसमुसत, " नाही माझच चुकल,sorry !" म्हणालेलीस.
’ए येडु, आता रडायच नाही. हास पाहू.’ म्हणताच
नाजुक कळी चेहर्यावर 
उमलली होती तुझ्या..
आणि मग ती ओठांनी टिपून घ्यायचा वेडा
प्रयत्न केला होता मी...
खिडकीतून हे सगळं 
बघणारा पाऊसही मग आपल
उग्र रूप सोडून 
हळुवार बरसत राहीला होता..
..
..
..
आजही स्वप्नात 
जेव्हा जेव्हा 
तुझ माझ भांडण सुरू होत

तेव्हा हा 
पाऊस आधीच हजेरी लावतो..
गालातल्या गालात 
हसत आधीच शहारतो...

- अजय

No comments:

Post a Comment