Saturday, October 4, 2014

स्वप्न ७०

स्वप्न ७०

स्वप्नांच वादळ
दररोज माझ्या
रात्रींवर
स्वार व्हायच...
माझी नौका 
हेलकावायची
झोकांडे घ्यायची......
त्यात बुडतोय का काय
याची भिती वाटायची..
पण
हळुहळू 
त्याची सवय होत
गेली आणि
आता त्यातही 
एक मजा लपलेली
असते हे कळू लागलय..
आयुष्यात वादळ हवच..
पाणी संथ वाहत असल की
काहीही न करता सुध्दा
आयुष्यनौका
पुढे जात राहतेच......
पण 
कधीतरी 
आपल्यात लपलेला
खलाशी आपल्यालातरी
उमगावाच.........

-अजय

No comments:

Post a Comment