Wednesday, September 30, 2009

भेट

अशीच अचानक एकेदिवशी
तिची नि माझी भेट झाली,
कल्लोळातील अपुर्व शान्तता ,
क्शणभर मध्ये उभी राहिली...

मग उगाचच सुरु केल्या,
इकड-तिकडच्या चार-दोन गप्पा,
सन्वाद साधायचा कधीकधी,
खरच हा मार्ग असतो सोपा!!!!

विचारल तिने मग, काय रे?
नवीन काही लिहिलेस का नाहीस?
निसटली होती पानं सगळी,,,,,,,
पुन्हा नविन वही केलीस का नाहीस?

"हो" म्हटल खरं पण,
आता काय सांगु तिला,,,,
जुनी वही, जुन्या पानांवरच....
कविता भेटायची रोज मला!!!!!!!!!!!!

"तू कशी आहेस?" मध्येच ,
तिला मी विचारलं...........
हसली ती अन आभाळही
तेव्हा मिश्कीलपणे हसलं.............

जुनं जुनं काही आठवलच आता,
तर ते जोडुन टाकायच स्वप्नांशी......
जाहला आहे करार असाच ,
आसवांचा आसवांशी...........


बोलता बोलता डोळे तिचे,
भरुन आले अचानक...................
पाहुन घड्याळ मग बोललो मीही,
"येतो ! असु दे ओळख........"!!!!!!!

मोगरा फ़ुललाच होता........

'हास ना' होतीस म्हणाली, निघुनि दूर तू जाताना !
आसवेही मग हसली माझी, वळुनि पुन्हा तू बघताना !!

थांब मी म्हणणार नाही, तुही जा न थांबता !
झाली ना सुरुवात,त्याची का करावी सांगता?

का अवेळी कंठ दाटे, का अनामिक ओढ लागे !
स्वप्न ओल्या पापणीतून, का तुझा मज स्पर्श भासे !!

सावली हळवी तुझी ती, भेटते मज सांजवेळी !
मागुनि सर्वस्व माझे, हासते ती सावलीही !!

माळिशी गजरा म्हणुनि, तो फ़ुलांचा हार ना !
गुंफ़ल्या माझ्याच होत्या, शब्द वेड्या भावना !!

भास तुझा ठरल्याप्रमाणे, आजही आलाच होता !
आजही अंगणात वेडा, मोगरा फ़ुललाच होता !!

तुझं माझं नातं ........

खूप खूप बोलावं
तेवढच कधी भांडावं,
तुझं माझं नातं
रोज नव्यानेच उमलावं !!धॄ !!


नवीच ओळख आपली जणू
असेही कधी भेटावं
बोलता बोलता डोळ्यात पाहत
दोन क्षण थांबावं.......
कधी कधी भेटल्यावरती,
अबोल अबोल रहावं....
तुला वाटे मी, मला
आज तू काही बोलावं......
घडत नाही काहीच असं,
मग रुसून तूही निघावं !!१!!

तुझं माझं नातं
रोज नव्यानेच उमलावं !!!!!!

आवडतं तुला म्हणून मीही
उगाच हलकेच हसावं...
चोरून मला बघताना तू,
हळूच तुला पहावं.....
नजरेला नजर भिडताच
पुन्हा तुही थोडं लाजावं...
आणि आठवून सारं सारं
मीही रात्रभर जागावं !! २ !!

तुझं माझं नातं
रोज नव्यानेच उमलावं!!!!!!!

तुला मला कळतच सगळं
पण आधी कुणी बोलावं?
मुकं प्रेम माझं-तुझं,
शब्दांवाचून झुरावं.....
व्याकुळ व्याकुळ होवून
आपण दरदिवशी भेटावं...
आणि दरवेळी आपल्यामध्ये,
अबोलीनेच फ़ुलावं !!३!!

तुझं माझं नातं
रोज नव्यानेच उमलावं!!!!!!!

वाटतच कधी आज तुला,
सगळं सगळं सांगावं.....
नेमकं त्याचदिवशी उगाच,
तू माझ्यावरती रुसावं....
'ऐक ना जरा' म्हटलं मी,
की फ़िरवून पाठ तू बसावं...
आणि चिडून मग मीही,
तेव्हा तडक तिथून निघावं !!४!!

तुझं माझं नातं
रोज नव्यानेच उमलावं!!!!!!!!!!

जमलं नाही प्रेम ज्याला
भाषा हवी, शब्द हवा....
आपलं प्रेम अजबच...
त्याला स्वप्नांचाच गाव हवा..................
........
झालो मग मी चंद्र कधी,
तर आभाळ तू बनावं...
कधी तुझ्या फ़ुलांसाठी,
भ्रमर मीही बनावं....
डोळ्यात घेवून पहाट,
तुझीच रोज मी उठावं....
स्वप्न व्हावे खरे म्हणून
रोज 'त्याला' विनवावं,
वाटे मला आजतरी त्याने...
"तथास्तु" म्हणावं...
त्याने आपलं नेहमीसारखं,
फ़क्त यावर हसावं !!५!!

तुझं माझं नातं
रोज नव्यानेच उमलावं!!!!!!!!

भास !!!

का मनाचे मनाला गीत हे उलघडेना,
सत्य का फ़क्त तु भास माझा, कळेना !!!!


अंतरीचे तुझ्या
सुर मी छेडीले,
आणि पाणावले
अर्थ डोळ्यातले.....

आसवे का तुझी ही स्वप्नमाला, कळेना!
सत्य का फ़क्त तु भास माझा, कळेना !!!!


बोलले ना कधी,
प्रेम केले जरिही..
मौन माझे तुझे,
भेटते का तरिही??

मौन मौनातले हे प्रेम मजला, कळेना !
सत्य का फ़क्त तु भास माझा, कळेना !!!!

येना येना प्रिये तू,
घे मिठीत मला तू,
श्वास श्वासात माझ्या
ये फ़ुलुनि पुन्हा तू.............

साद देता तुला का दुख आले, कळेना !
सत्य का फ़क्त तु भास माझा, कळेना !!!!

हारलो आज मी............
हारले काव्य हे................
शल्य नाही तुला
कधीही कळणार हे.....

हार माझी म्हणू का जीत तुझीही, कळेना !
सत्य का फ़क्त तु भास माझा, कळेना !!!!

बंध!!!

भाव बंधातुनि वाहतो......
वळणावर तव तुझ्याचसाठी आर्त मी थांबतो!!!!!!

भास तुझे मज होती क्षणभर......
क्षणांवरी मग हसतो क्षणभर......

सांज ढळता ढळतो मीही....
तुझ्याविना न उरतो मीही...

मीच मला शोधतो.....
भाव बंधातुनि वाहतो!!!!!!!!!!!!!!!!

गीत तुझे घेउनि ओठी...
मनात हळवी सागर भरती..

भरतीचा परि चंद्र दिसेना...
काळोख अवघा काही दिसेना...

अल्लद हळवे सुर बुडाले....
वादळ वेडे शीड बुडाले...

लहरींवर त्या विरघळलेले गीत तुझे शोधतो..
भाव बंधातुनि वाहतो!!!!!!!!!!!

सर सर श्रावण बरसत येतो..
थेंब उन्हाचे मजला देतो..

दुख मनाचे चमकुन जाते,
वीज होउनि नभात हसते..

अंगण ओले...... कुंपण ओले......
खिडकीवर अन मनही ओले...

ओल्या मातीतुनि उगा मग गंध तुझा दरवळतो.
भाव बंधातुनि वाहतो!!!!!!!!!!!!!!

Nirop

तू म्हणशील आता, शब्द शब्द
ठेवीन तुझे मी, जपून जपून...
तू म्हणशील आता, जाता जाता
बोलायचं होतं... बरच अजून........

तू म्हणशील हल्ली गार वारा,
स्पर्श तुझाच जातो देऊन.......
तू म्हणशील आता, रात्र रात्र
तुझीच स्वप्नं येते घेऊन.......


तू म्हणशील,.. आतासुध्दा रात्र होतेच...
चंद्र येतोच.... चांदण्या घेऊन......
पण.. बघता बघता डोळ्यात आभाळ...
उतरत जातं... अन येतं भरून.......

तू म्हणशील आता अर्थ अर्थ
शब्दांविनाच येतात कळून.....
तू म्हणशील, वेड्या, मौनसुध्दा
कित्ती बोलकं असतं !... हसून........


तू म्हणशील आता, पाऊस पाऊस
तुझीच गाणी येतो घेऊन.....
रिमझिम रिमझिम आठवण आणि
मन जातं चिंब भिजून...............

तू म्हणशील आता, जाता जाता....
बोलायच होतं.....बरच अजून.........

आठवण !!!!

तुझी फ़क्त एक आठवण आली की...
.....
काय काय होतं माहितीये..................

मी बराच वेळ तुझ्या आठवणींमध्ये रमून जातो....
मग उगाचच काहीतरी सुचायला लागतं...............
केवळ ते तुझ्यामुळं सुचतयं म्हणून मग मी लिहीत जातो............
मग दोन... तीन.... चार.... अशी वाक्याला वाक्यं जुळून येतात..........
प्रत्येक वाक्यात पाच-सहा शब्द..... तेही तुझेच.... मागे-पुढे रेलून बसतात....
शब्दांमधली अक्षरं..... गालातल्या गालात हसत राहतात................
मग उगाचच कुठेतरी स्वल्पविराम टाकतो...........
जिथे शब्द जास्तच धीटपणे बोलतायेत वाटलं की पुर्णविराम...........
आणि हे कल्पनेतलं वाटावं म्हणून मग उद्गारवाचक चिन्हं लावतो दोन चार.................
अस करत करत मग पान भरून काहीतरी तयार होतं................
मग त्याला 'कविता' म्हणून नाव देत मी मोकळा होतो............
मग ती दोन तीन मित्रांना पाठवतो...........
कुणी छान म्हणतं.............. कुणी फ़क्त हसतं.............
पण या सगळ्यापासून अनभिद्न्य तू कुठेतरी दूर दूर असतेस............
तुला या सगळ्याशी काहीही देनं घेणं नसतं................
आणि मला.......................................................
मला मात्र ती कविता वाचून पुन्हा तुझीच आठवण येते....................
आणि तुझी आठवण आली की................
...................................
.................
.................

Saanjwel!!!!!!!!!!!!!!!!!!

आभाळ सांजवेळी
पक्षी टिपून गेला..
खिडकीत दोन डोळे,
वारा पुसून गेला.........

मिटल्या हळूच होत्या,
जखमा मनात माझ्या...
उरल्या खुणांवरी का,
सांडून गंध गेला.........

भिजले तळ्यात होते,
आभाळ चांदण्यांचे......
भिजल्या मनास माझ्या,
निजवुनि चंद्र गेला.........

पाळून मौन फ़िरतो,
रानात हा अबोला........
माझ्या मुक्या स्वरांचे,
होऊनि गीत गेला..........

वाटेत सांडलेले,
ओले धुके कुणाचे........
मज वाटते असे का,
तुझाच स्पर्श झाला........


पाऊस ना कळे तो,
आला कुठून होता.....
हळ्व्या तुझ्या मनाचे,
काढून चित्र गेला...........


आभाळ सांजवेळी
पक्षी टिपून गेला...................

गझल

कळले मला न केव्हा, आकाश उडुनि गेले !
अन शोधताना केव्हा, आयुष्य सरुनि गेले !!

मी बोलतो तुझ्याशी, घेउन तुझेच शब्द !
तू हास ना जराशी, कळतील सारे अर्थ !!

देशील तुच मजला, जे इच्छिले मी आहे !
येउन जा जराशी, ही रात्र अधुरी आहे !!

लिहीतो तुला स्मरुनि, स्मरले तुला न काही !
सुचते तरी का भासे, सुचलेच काही नाही !!

आवाज पैंजणांचा, रात्रीस येत आहे !
चाहुल ही तुझी का, माझाच भास आहे !!

ना भेटली मला तू, चुकलेच वाटे काही !
चुकल्या अशा दिशांचा, मी खेळ रोज पाही !!

नात्यास आपुल्या या, मी ठेविले जपुनि !
तू सांगशील तेथे, येइन मी फ़ुलुनि !!

तू बोलली मुक्याने, कळले मला न काही !
मौनात या तुझ्या मी, मज पाहिलेच नाही !!

म्हणलीस तू म्हणोनि, लिहीतो अता पुन्हा मी !
मिळतील दाद जेव्हा, अर्पिण त्या तुला मी !!

मी वाट कशाची बघतो, हे आज मलाही कळेना !
श्वास तुझा का आज, श्वासास या मिळेना !!

हसले का चांदणे हे, हे काय गुढ आहे ?
सांग, तुच आता काही, ही रात्र अबोल आहे !!

मी लिहितो तुला स्मरुनि, हे बोललो कुणा ना !
कळले तुला जे नाही, कळणार काय त्याना?

सुचलीस तुच मजला, माझे न श्रेय काही !
मी राहीलो किनारी, हा दोष तुझाही नाही !!

जे इछ्छिले मिळो तुज, ही एकच इछ्छा माझी !
कळले मला उशीरा, हरण्यात जीत माझी !!

कळणार ना तुला हे, का रात्र जागली होती !
येउन किनार्यावरती, का नाव बुडाली होती !!

Tuesday, September 29, 2009

पाऊस

आज चार वाजल्यापासूनच जोराचा वारा सुटला होता... आणि मुसळ्धार पाऊस सुरू झाला..............मी गॅलरीत त्याची वाट बघत उभी होते..
रस्त्यावर एक चिट पाखरू सुध्दा दिसत नव्हत. या पावसाच गणितसुध्दा अजिबात कळत नाही.. सकाळी एक थेंबसुध्दा नव्हता.. आणि आता नुसत थैमान घातल
होत. ६ वाजताच सगळीकडे काळोख पसरला.... पाऊस जरासुध्दा कमी होईना. आणि त्याचा तो आवेग पाहून रात्रभर तरी हा थांबत नाही असच वाटत होतं.
आज ऑफ़िसमधून पाच वाजताच निघतो अस म्हणाला होता.सात वाजत आले तरी ह्याचा पत्ता नाही म्हणून मन बेचैन झाल होतं. पावसाचे दिवस असताना ह्याला
लवकर निघायला काय होतं. त्यात सकाळ्पासूनच अंगात बारीक ताप होता. मग तीन-चार लाच निघावं ना? सात वाजत आले तरी पत्ता नाही.
नेमक्या त्याचवेळेस लाईट्स गेल्या. काळोखातला अंधार उगाचच स्पष्ट दिसतोय असा भास होत होता. दार वाजल्याचा सारखा भास होत होता. आज पावसाने
खरच अगदी कहर केला. थेंबभर सुध्दा कमी झाला नव्हता. घरात इकडून-तिकडे मी येरझार्या घालत होते. काहीच सुचत नव्हत. ह्याच्या मोबाईल वर कॉल करायचा
प्रयत्न केला तर नेटवर्क प्रॉब्लेम. ह्या मोबाईलचा पाहीजे तेव्हा उपयोग होईल तर शपथ. त्याच्याकरता डॉक्टरांची सात वाजताची वेळ घेतली होती .ती पण निघून
गेली होती. ह्याला ताप आणि सर्दी झाली की हा असा केविलवाणा होऊन जातो की बास.. मलाच कसतरी होत मग. काय कराव काहीच कळत नव्हत.
इतक्यात दारावर थाप पडली. मी लगेच जाऊन दार उघडले. हा समोर उभा होता.. नखशिखांत भिजलेला. थंडीने अक्षरश: कुडकूडत होता. त्याला तसच आत
घेतल. अरे काय हे, पाच वाजता निघणार होतास. ... टॉवेलने त्याचे डोके पुसत पुसत मी त्याच्यावर चिडूनच बोलले. तुझी सात वाजताची डॉक्टरांची
appointment होती हे सुध्दा विसरलास ना? अंगात ताप असताना एक दिवस सुद्धा लवकर निघता येत नाही का. मी वेड्यासारखी दोन तास झाले, इथे
ताटकळत तुझी वाट पहात उभी आहे. तू माझ्याशी अजिबात बोलू नकोस. अंग बघ, किती गरम झालय. तुला पाहिजे ते कर. तुला माझी अजिबात परवा नाहीये...
तेवढ्यात बाहेरची मेणबत्ती विझली. मी काडीपेटी आणायला आत गेले. एवढ्यात ह्याने बाहेरून आवाज दिला, 'ये अग, आपल्या दोघांना मस्त आल्याचा चहा
कर ना... ' मी काहिही उत्तर न देता गॅसवर चहा ठेवला आणि बाहेर येऊन मेणबत्ती लावली. तो माझ्यासमोर येऊन उभा राहीला आणि हात पुढे करत म्हणाला, '
ये. हा घे, मोगर्याचा गजरा............. सकाळी निघताना तू म्हणाली होतीस ना, आज गजरा माळायची इच्छा झाली आहे. पाच वाजताच निघालो अग, पण एवढ्या
मुसळधार पावसात एकही दुकान सापडेना. फ़िरून फ़िरून दमलो. शेवटी त्या टेकडीवर माळीकाका राहतात ना त्यांच्या घरी जाऊन घेऊन आलो. कितीही जपून
आणायचा म्हणलं तरी थोडासा भिजलाच बघ...........................................................

Swapn!!!!!!!

ती म्हणली मला, काल खूप छान स्वप्न पडल होत ... संततधार पाऊस पडत होता. मातीचा गंध चहुकडे दरवळ्त होता..
पावसाचा प्रत्येक थेंब न थेंब मला वेडावत होता... मी त्या पावसात ओलेचिंब भिजले होते.. माझ्या रोमा-रोमात जणू ओला प्राजक्त फ़ुलून आला होता
ऐकल आणि खूप हसू आल मला... चिडून ती म्हणाली... काय रे, हसतोयस काय असा... तुला पटत नाहिये का? जा, बोलू नकोस माझ्याशी!!!!!!!!!
अग काय सांगु अता.. पटणार नाहीच तुला...... काल मलाही एक स्वप्न पडल होतं.. अगदी वेगळंच.............
काल पहिल्यांदाच........... स्वप्नात मी पाऊस झालो होतो !!!