Saturday, October 4, 2014

स्वप्न ५२

स्वप्न ५२

सकाळी गॅलरीत उभा राहून चहा पिताना समोरच फ़ुललेला मोगरा दिसला
आणि काल रात्रीच स्वप्न पुन्हा दरवळू लागल माझ्या आसपास..
" तूसुध्दा लिहितेस हे कळल आणि मी हट्ट धरला ते वाचण्यासाठी. 
मला तुझी वही हवी म्हणून एखाद्या लहान मुलासारखा रुसून बसलो..
तू घाबरलीस..बावरलीस.. नाही म्हणालीस..
पण माझा हट्ट कायम..
संध्याकाळी वाट बघीन नक्की म्हणत तुझ काहिही न ऐकता निघून गेलो..
संध्याकाळी आपण भेटलो.. का असा हट्ट करतोस..
नको ना रे म्हणत माझ्या शेजारी बसलीस..
मी हात पुढे केला.. नाही नाही म्हणत वही हातात दिलीस..
तुझ्या ’नाही’ मध्ये दडलेला होकार तेव्हासुध्दा लक्षात आला नाही माझ्या.. छे...
मी ती वही जवळ घेतली..... पानं उघडली आणि डोळे बंद करून 
त्या पानांवरच्या कवितांचा स्पर्श, गंध साठवू लागलो..
तू हसलीस..
वेडायस तू खरच, म्हणत, बर आता मला काय देणार आहेस? म्हणालीस
मी हळूच मोगर्याचा गजरा समोर धरला..
तुम्ही दोघेही काही क्षण एकमेकांत हरवून गेलात..
नंतर तू गजरा जवळ धरत रमून गेलीस त्याचा गंध स्वत:मध्ये सामावून घेण्यात
आणि मी तुझ्या डोळ्यातला बहर टिपण्यात..
मी नेहमीच असाच साठवत राहायचो..... टिपत राहायचो तुला..
तीच साठवण खतपाणी देत राहीली
आणि कळलसुध्दा नाही कधी 
मनामध्ये माझ्याही नकळत पेरल गेलेल प्रेमाच बीज
वटव्रुक्ष बनून बहरून आल..
आता याच वटव्रुक्षाच्या सावलीत
आयुष्य विसावलय..
स्वप्न. आठवणींच्या पारंब्यांवर
आयुष्य झोके घेतय फ़क्त.....

-अजय

No comments:

Post a Comment