Saturday, October 4, 2014

स्वप्न ६६

स्वप्न ६६

शेवटचच भेटू 
म्हटली होतीस...
स्वत:ला हजार वेळा नाही 
म्हणल होत तरी
केवळ तू म्हणालीस म्हणून 
भेटायला आलो...
,,,,,,,,
पापणी
किंचितही न लवता
फ़क्त पहात होतो 
तुझ्याकडे..
एकसंध...
एकचित्त....
...
बोल ना काहीतरी 
म्हटली होतीस खर..
पण मी बोलणार नाही 
हे तुलाही ठाऊक होत...
.....
पण.. बोललोच नसतो 
असही नाही...
खर तर....
तुझ जायच निश्चित 
होत 
तरीही....
खूप काही 
बोलायच होत.. 
जे जे फ़क्त मनात
होत ते 
सगळकाही
सांगायच होत...
पण नाही बोललो....
कारण..
मनातलं बोलून
मन हलक 
होण्यापेक्षाही
"तू जाते आहे आता दूर....
कायमची."
हे स्वप्न नाही,
हे स्वत:ला पटवून देण 
फ़ार गरजेच होत......
म्हणून तर
जोपर्यंत समोर होतीस 
आणि निघून गेलीस तेव्हा 
जोपर्यंत दिसत होतीस
तोपर्यंत
पापणी 
मिटली नव्हती
एकदाही.....

-अजय

No comments:

Post a Comment