Saturday, October 4, 2014

स्वप्न ५६

स्वप्न ५६

स्वप्न ..आठवणी यांनी खचाखच 
भरून जाते बस,
मी पोहचण्याआधीच..
आणि माझी ती पकडण्यासाठी रोज 
सुरू असते धडपड...
जवळ पोचतो न पोचतो तोच
सवयीने हा 
आयुष्यनामक कंडक्टर
बेल वाजवतो
आणि बस निघू लागते...
...
...
मी पुन्हा माझा वेग वाढवतो..
पळू लागतो...
कसाबसा शेवटच्या पायरीवर 
पाय ठेवायला 
जागा मिळते..
मग तसाच 
दाराशी लोंबकाळत
उभा राहतो..
.
.
.
छे..माझ्या जीवन प्रवासात
मलाच जागा
उरली नाहीये 
कुठे....

-अजय

No comments:

Post a Comment