Saturday, October 4, 2014

स्वप्न ४४

स्वप्न ४४

अजून एक वर्ष सरल.....
आता 
येणार नवीन वर्ष सुध्दा
असच भरभराटीच..आनंदाच,
स्वप्नांनी समॄध्द,परिपूर्ण अस
जावो
म्हणून या रात्रीने
स्वप्न गुढी उभारली आहे
आणि आजही 
अगदी हट्टाने
मी 
रात्रीकडून आठवणींच्या
असंख्य 
.
.
साखरगाठी 

मागून घेतल्या आहेत..

-अजय

No comments:

Post a Comment