Saturday, October 4, 2014

स्वप्न ५१

स्वप्न ५१

आज अगदी सकाळीच चक्क चक्क ती माझ्या घरी. 
मी देवघरात पूजा करत होतो, अगदी शेजारी येवून बसली
सत्यनारायणाच्या पूजेत जस भटजीबुवा
हाताला हात लावायला सांगतात
तसा..अगदी तसा हात धरला माझा
क्षणभर मीच घाबरलो..तिच्यातला तो धीटपणा पाहून गोंधळलो
"अगं आई बघेल", म्हटल तर 
"बघू दे!! होणारी सून आहे त्यांची मी..", तिचं निर्धास्त उत्तर....
पूजा आटोपून खोली मध्ये जातो न जातो
तोच ती पुन्हा समोर हजर.. 
जराशी लाजत..डोक्यावर ओढणी घेत,
"अहो चहा आणलाय आपल्यासाठी. इकडून घेणं कराव.."
"अगं हळू कुणीतरी ऐकेल.."
"इकडून अस रागावू नये..." हसत हसत तिच प्रत्युत्तर....
मी चहाच कप बाजूला ठेवत तिला जवळ ओढल
आता मात्र तिच्या चेहर्यावरचे धीट भाव शर्मिले होत होत
माझ्या कुशीत शहारू लागले..
अरे सोड. आई येतील..
येऊ दे ना. बायको आहेस होणारी माझी तू..
गप्प.. अरे कुणीतरी पाहील खरच. सोड ना..
नाही सोडणार...
सोड...
नाही..."

’अरे नाही काय उठ ,८ वाजत आले’,
आईच्या आवाजाने दचकून जागा झालो..

-अजय

No comments:

Post a Comment