Saturday, October 4, 2014

स्वप्न ६३

स्वप्न ६३

२१ वा मोदक संपवून .. 
ढेकर देत बाप्पा म्हणाला,
’माग ...काय हवे ते माग तुला...’
मागशील ते देशील???
’मागून तर बघ.....’
बघ ह बाप्पा विचार कर पुन्हा.....,
’ए घाबरवू नकोस मला..’ हसत हसत बाप्पा म्हणाला...,
’माग तू बिंधास्त...’
..
..
..
कारण 
मागच्य़ावर्षीसुध्दा तू 
मला वर दिला होतास मी मागितलेला.....
...
की ’ती’ नेहमी माझ्यासोबत असु दे...’....

पण तस काहीच झाल नाही.. बघ..कुठे आहे ती??
............
...
बाप्पा फ़क्त हसला....
....मला जवळ घेत म्हणाला...
'
आठवून बघ.!!!!
गेल्या वर्षात एक तरी क्षण 
असा गेलाय का जेव्हा
तुला तिची आठवण आली नाही.. 
वा.. आभास झाला नाही...
............
....एक तरी रात्र 
अशी सरलीये का 
जेव्हा ती स्वप्नात आली नाही....
...
..
.....

यापेक्षा ’सोबत’ 
या शब्दाचा 
दुसरा अर्थ असू शकतो का???
'
................
..................
.......
अनुत्तरीत मी..... 
...
...

हात जोडून 
बाप्पा समोर उभा राहीलो..

"मग आज अजून एक वर दे मला...
आयुष्यभर निस्वार्थी.. निर्मळ.. प्रेमाचा झरा 
मनातून वाहत राहो......

अखंड..."

-अजय

No comments:

Post a Comment