Saturday, October 4, 2014

स्वप्न ७५

स्वप्न ७५

"
माझ्या एका हातात ताजमहल

आणि दुसर्र्या हातात मुमताझ...

शेपूत नसलेला मी हवेत 
सो सो करत उडत चाललोय...

आणि माझ्या मागे शाह-जाहन
आणि त्याची लक्शावधी फ़ौज.....

हवेतच माझ्यावर तोफ़ांचे मारे....

आणि माझे अचूक चकवे..

ही तुझी मुमताझ नाहीये.....
माझा आकांड तांडव....

पळापळ सुरू..... 

खूप वेळाने खाली नजर गेली
तर हुबेहूब ताजमहल ....

तो पाहून शाहजहान चा सुटकेचा निश्वास..

तो .. त्याचे सैन्य माघारी...

हातावरच्या ताजमहल वर 
साचलेली धूळ साफ़ करत

असताना 
इतक्या वेळानंतर आता
माझी
विचारचक्रं सुरू...

च्यायला.!!!!!!!!!
ताजमहल चे एकवेळ ठीक
आहे . तो मी बांधला असेनही
पण जिच्यासाठी बांधावा अशी 
"मुमताझ" 
माझ्या आयुष्यात कधी आली?

..
...
...
..
"
काल पहिल्यांदाच कॉलेजमध्ये
तिला पाहीलं..
आणि पहिल्यांदाच 

ही अशी
चित्र विचित्र स्वप्ने पडू लागलीयेत..

-अजय

No comments:

Post a Comment