Saturday, October 4, 2014

स्वप्न ७२

स्वप्न ७२

इतक्या वर्षांनी...
पहिली भेट.....
स्वप्न खरही होत यावर
विश्वास बसत नव्हता....
डोळे भरून फ़क्त पहात
उभा होतो तिच्याकडे...
जितका तॄप्त...तितकाच
पुढच्या क्षणाला
अतॄप्त.......
जवळ येत तिने हात
पुढे केला....
...
..आजही ओळखलच 
तिने....
.....
मोगर्याचा गजरा.......
....
हातांवर ठेवला तिच्या....
ती हरवून गेली..
त्याच्या गंधात....
आणि
मी..
पुन्हा तिच्यात......
काय होतय हे न 
उमगण्याच्या
पलिकडे गेल्यासारखा.....
भावनांना शब्द कमी पडतात
खरच........
..... जगण्याचा अर्थ 
म्हणजे ती....
आयुष्य 
म्हणजे ती....
...
मंदिरामध्ये फ़ुलांनी पुजलेल्या
मुर्तीकडे पाहून 
जेवढं प्रसन्न..आनंदी
वाटाव तशी ती..........
जिथे नतमस्तक व्हाव..
स्वत:ला अर्पण कराव.... 
तशी ती........
भावनांना शब्दही
समर्पित होतात 
उरते फ़क्त
गाभार्यामध्ये 
भरुन राहिलेली
धूप.... 
आणि शांत तेवत
राहिलेली समई....
........
.......
खाली बसत 
दुसर्या हातात
लपवलेली फ़ुलं....
...
तिच्या पायांवर 
अलगद वाहिली..
......
नकळत मान खाली
झुकली...
...
..
-अजय

No comments:

Post a Comment