Saturday, October 4, 2014

स्वप्न ४७

स्वप्न ४७

जशी रात्र 
अंगणात पाऊल ठेवते.....
तसा मी मांजरीसारखा 
तिच्या जवळ जातो...
आणि तिच्या पायांमध्ये घोळत राहतो..
सुरूवातीला ती माझ्याकडे 
बिलकुल लक्ष 
देत नाही.......
कधी पायांनी दूर लोटते..
एक दोनदा 
माझ मानगुट पकडून मला लांब सोडून येते..
....
....
पण मी पुन्हा तिच्या 
समोर येऊन उभा राहतो..
........
आता मी सहजासहजी जाणार नाही
याची खात्री पटल्यावर 
मग 
ही रात्र 
काही थोडीफ़ार 
स्वप्ने एका 
वाटीत ओतत
ती माझ्यासमोर ठेवते,
आणि
.
.
.
तेव्हा कुठे मी 
डोळे मिटून घेतो.

-अजय

No comments:

Post a Comment