Saturday, October 4, 2014

स्वप्न ८३

स्वप्न ८३

हल्ली आभाळ भरून
आलं की ...
मीच 
बरसू लागतो त्याच्याआधी .......
...
...
त्याच्यावरच !!
आणि मग 
हिरव्या हिरव्या 
आठवणींवर 
बिलगून बसून 
राहातं मनं !!!!!!
.....................................
..................................
हल्ली भरतीचा 
समुद्र बघता बघता 
कळतही नाही 
कधी सुरु होते 
मनात 
अबोल 
ओहोटी .......
..........................
.........................
हल्ली दिवसभर 
एखाद्या 
प्रेयासीसारखी चिकटून राहते 
.........झोप !!!!!!!!!!!!! 

आणि मग रात्र ....
रेंगाळत राहते 
आसपास.............
.........................
रात्रभर ...............................!!!!!
तेव्हा मी मग 
कोरत बसतो 
स्वप्न चंद्र ...
.....................
........................
हव्या हव्या वाटणार्या 
चांदण क्षणांसोबत !!!!!!!
......................................
..................
हल्ली जेव्हा रातराणी हुंगतो ..... 
तेव्हा का कोण जाणे 
आठवू लागतो..
.
..
मोगरा !!!!!!!!!!!!!!!!!!
आणि त्याच्या आठवणीत 
बुडतोय तोच 
डोळ्यातून 
ओघळू लागतो ...
..................
...................
प्राजक्त !!!!!!!!!!!!
.....
...

हल्ली उकळणाऱ्या चहात 
फिरताना दिसते ... 
माझे आयुष्यं ....
...................
......................
आणि मला मात्र 
वाटत राहतं 
................
............... 
बसून राहावं शांत 
फुलपाखरू 
होऊन ...
..............................
..........................
दुधावरच्या 
सायीवर !!!!!....


बघ.... काय काय घडू लागलंय हे !!!
आता खरच....
...
भेट लवकर !!!!


-अजय

No comments:

Post a Comment