Saturday, October 4, 2014

स्वप्न ४६

स्वप्न ४६

गणपती विसर्जनाचा दिवस आला की
कशी हिरमुसली होवून जायचीस.....
आज बाप्पा जाणार म्हणून सकाळपासूनच 
तुझे डोळे पाणावलेले असायचे..
लहान मुलासारखी माझ्या कुशीत येवून 
रडायचीस..
कशीबशी समजूत काढायचो तुझी
..
..
..
..
..
..
..
त्यानंतर 
इतकी वर्ष 
सरली
.
.
दर अनंत चतुर्दशीच्या रात्री
न चुकता बाप्पा स्वप्नात येतो... म्हणतो,
"
आज निघायचा दिवस.. पण 
तिची आठवण आल्यावाचून राहात नाही...

जाता जाता पावलं अडखळतात 
उंबरठ्याजवळ माझी..

पुढच्या वर्षी लवकर या म्हणायची मला,
म्हणूनच
दरवर्षी न चुकता येऊन जातो..
"
भरून आलेल्या बाप्पाला मी जवळ घेतो
तो मनसोक्त रडतो... हलका होतो..
माझ्या खांद्यावर 
साठून राहिलेल्या त्याच्या
अश्रूंमध्ये मी 
माझ अजून एक सरल वर्ष
विसर्जित करतो..
.
.
.
गेलीस पण 
.
.
सगळ्यांनाच लळा लावून गेलीस .. 

-अजय

No comments:

Post a Comment