Saturday, October 4, 2014

स्वप्न ६८

स्वप्न ६८

आज कुठे गेली आहेत
सगळी स्वप्नं काय माहीत...
......
शोधून शोधून दमलो
सगळ्यांना..
.....
आतापर्यंत कधीच 
अस झाल नव्हतं खरं...
.......
काय करावं
विचार करत करत
आराम खुर्चीत बसून राहीलो
.......
.......
काहीवेळाने
आपोआप डोळे मिटले...
....
पण...
पहिल्यांदाच
...
डोळे मिटून 
घेतल्यावरसुद्धा
पापण्या जड 
वाटू लागल्या..
......
........
........

पहातो तर 
सगळी स्वप्ने
पापण्यांच्या 
तळाशी रेलून बसली
होती.. 
दूर कुठेतरी शुन्यात पहात
हरवल्यासारखी...
......
.......
........
इतकी वर्ष 
जिथे तुला
साठवून 
ठेवल होत
कुणालाही 
कळू न देता..

तो 
चोरकप्पा 
अखेर
त्यांना
सापडलाच तर..

-अजय

No comments:

Post a Comment