स्वप्न ४९
रोज दारावर थाप पडते
मी दार उघडतो..
समोर केविलवाणा चेहरा करून
उभी असते, रात्र !!!
मला दया येते..
मी माझ्याजवळचा
कुट्ट अंधार
रात्रीला
उसणा देतो..
..
..
बदल्यात रात्र
माझ्या ओंजळीत
काही स्वप्ने धरते..
.
..
मी ती घेतो पण
माझा काळोख पहाटेपर्यंत
मला परत करण्याच्या अटीवरच
...
...
कारण
हक्काने
आपल म्हणाव
असा
हा
काळोखच
उरलाय
तेवढा
माझ्याकडे...
-अजय
रोज दारावर थाप पडते
मी दार उघडतो..
समोर केविलवाणा चेहरा करून
उभी असते, रात्र !!!
मला दया येते..
मी माझ्याजवळचा
कुट्ट अंधार
रात्रीला
उसणा देतो..
..
..
बदल्यात रात्र
माझ्या ओंजळीत
काही स्वप्ने धरते..
.
..
मी ती घेतो पण
माझा काळोख पहाटेपर्यंत
मला परत करण्याच्या अटीवरच
...
...
कारण
हक्काने
आपल म्हणाव
असा
हा
काळोखच
उरलाय
तेवढा
माझ्याकडे...
-अजय
No comments:
Post a Comment