Wednesday, September 30, 2009

मोगरा फ़ुललाच होता........

'हास ना' होतीस म्हणाली, निघुनि दूर तू जाताना !
आसवेही मग हसली माझी, वळुनि पुन्हा तू बघताना !!

थांब मी म्हणणार नाही, तुही जा न थांबता !
झाली ना सुरुवात,त्याची का करावी सांगता?

का अवेळी कंठ दाटे, का अनामिक ओढ लागे !
स्वप्न ओल्या पापणीतून, का तुझा मज स्पर्श भासे !!

सावली हळवी तुझी ती, भेटते मज सांजवेळी !
मागुनि सर्वस्व माझे, हासते ती सावलीही !!

माळिशी गजरा म्हणुनि, तो फ़ुलांचा हार ना !
गुंफ़ल्या माझ्याच होत्या, शब्द वेड्या भावना !!

भास तुझा ठरल्याप्रमाणे, आजही आलाच होता !
आजही अंगणात वेडा, मोगरा फ़ुललाच होता !!

No comments:

Post a Comment