Monday, December 20, 2010

स्वप्न २



आज सकाळी चहा पिताना मला हसू आवरेना...

त्यावर आई म्ह्टली सुध्दा की,

"अरे काय वेड लागलय का?

काय हसतोयस असा.. "...

आता काय सांगु आईला,

काल मला काय स्वप्न पडलेलं......



"भरून आलेल आभाळ....

गार वारा..

मग हलकेच सुरू झालेला,

मातीत भिजत गेलेला आणि

मग सगळीकडे दरवळत उठलेला पाऊस.

.घरात आज आम्ही दोघेच..

एकसंध ऐकू येणारी ती पावसाची रिमझिम,

ती ऐकताना मनाला अनाहुतपणे सापडलेली

तरल,मोहक लय..

अशात चहाची तल्लफ़..

मी तिला चहा कर म्हटलेल..

तिने "तूच कर. मलाही ठेव",उत्तर दिलेल..

मी खोटखोट चिडून पुन्हा एकदा सांगितल आणि तिच्याकडून पुन्हा तेच उत्तर आलेल..

हळूच गालातल्या गालात हसताना तिला मी चोरट्या नजरेने पाहीलेले......

मग मी खिडकीत येऊन उभा राहिलेलो..

डोळ्यात तो बेधुंद पाऊस आणि तिचा तो हवा हवासा वाटणारा खट्याळपणा अलवार साठवत गेलेलो...

ती सुध्दा मग माझ्या जवळ येऊन उभी राहिलेली..

आणि "अहाहा,काय भारी वाटतय असा हा पाऊस पहायला.. फ़क्त हातात चहाचा कप हवा होता बास....!!!" म्हणत हसलेली..

आता मात्र न राहावून मलासुध्दा हसू आलेल...

आणि मग ती अलगदपणे माझ्या मिठीत शिरलेली...

त्यानंतर दोघे मिळून चहा करायला गेलेलो.........................................

.................आणि नेमक तेव्हाच लक्षात आल

की घरामध्ये दूध संपलेल..

.

ती,मी आणि बाहेरचा पाऊस

त्या गॅस वर उकळणार्या चहाकडे पाहात स्वप्नभर हसलेलो......"



-अजय

No comments:

Post a Comment