Monday, December 20, 2010

नशा : 3

दु:ख झाल तर ते विसरण्यासाठी

दारू प्यायची म्हणजे ते कुठेतरी पळून जात

अस मित्र म्हणाला होता

म्हणून मग एक दिवस बसलो बाटली घेऊन..

एक पेग झाला

दोन पेग झाले..

पाहतो तर चक्क चक्क

दु:खच समोर येवून बसल

म्हणाल, भर माझ्यासाठीसुध्दा एक पेग..

मी घाबरलो..

भीत भीत ग्लास समोर धरला

त्याने गट्कन रिकामा केला..

मग तीन.. चार पेग झाले..

उकडायला लागल म्हणुन फ़ॅन सुरू केला

तर भिंत हलू लागली..

आरसा हलू लागला

कपाट हलू लागल...

समोर बसलेल दु:ख सुध्दा हलत होत..

त्याला चढली म्हणून ते

डुलत असाव बहुतेक...

विचाराने मी जोर जोरात हसलो..

साल्याला इतक्यात चढली सुध्दा...

मी शांत... स्तब्ध होतो..

अजून एक भरू क? आता मी चढ्या आवाजात

विचारल..

ते घाबरत घाबरत हो म्हणाल..

अजून दोन तीन पेग झाले..

आता तर टेबलही हलू लागल..

ग्लास हलू लागले..

बाटली हलू लागली..

दु:ख तर हलणार्या

खुर्चीवर झोकांडे घेऊ लागल

पण मी मात्र

अगदी शांत..

स्तब्ध ....

...

..

मला हसू आवरत नव्हत..



-अजय

No comments:

Post a Comment