Saturday, October 4, 2014

स्वप्न ४५

स्वप्न ४५

हि स्वप्नं पण कधी कधी 
जुन्या आठवणी जिवंत करतात
आजचच स्वप्न-लहानपणीची सकाळ आज अगदी 
जशीच्या तशी स्वप्नात आली होती
.
"रविवारची सकाळ
..
चौथीतला मी
.
.
.चौथीतलाच सुर्य-.. भल्या पहाटे उठून पाढे म्हणत बसलेला
तेव्हा जसा तो निरागस.. साधा. भोळा वाटायचा तसाच..
रविवार असला तरी सकाळी ६:३० लाच मी उठलेलो..
आजीने नुकतीच देवपूजा 
आटोपली असल्याने सगळीकडे
धूप,उदबत्ती चा 
दरवळणारा सुगंध...
अंगणात ताई 
रांगोळी काढत होती
आईची स्वयंपाक 
घरात चहा-नाष्ट्याची सुरू असलेली तयारी.
बाबा हॉलमध्ये 
पेपर वाचत बसलेले..
घरातला एक 
अविभाज्य घटक असलेला रेडिओ 
भिंतीवर टांगलेल्या घड्याळाला १० मिनिटांनी खोट 
ठरवत..वेळ सांगत 
कार्यक्रमांना पुढे सरकवत होता.
स्वप्नात सुध्दा 
त्यातले कार्यक्रम जसेच्या तशे कानी पडत होते
या स्वप्नांच्या स्मरणशक्तीचा
हेवा वाटतो बर्याचदा
७ वाजले आणि बातम्या सुरू झाल्या
अगदी तशीच सुरुवात. तोच आवाज... 
..
’आकाशवाणी पुणे!!!!
भालचंद्र जोशी 
.
.
प्रादेशिक 
बातम्या 
.
.
देत आहे"
.
.
.
’अरे १० वाजत आले.. उठ लवकर’,मित्राने आवाज दिला 
आणि जाग आली. 
स्वत:शीच हसत हसत उठलो....
आवरल.. आणि हॉस्टेलमधून बाहेत पडलो
चहा प्यायला.

-अजय

No comments:

Post a Comment